नवी दिल्ली : ज्येष्ठ विधवा महिलांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करत आहे. मात्र, या योजनेला काय नाव द्यावे याबाबत सरकारला विचार पडला आहे. त्यामुळे या योजनेला काय नाव द्यावे असे सरकारने जनतेलाच विचारले आहे.


नाव सुचवा बक्षिस मिळवा..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने सोशल मीडियावर याबाबत एक स्पर्धाच सुरू केली आहे. ज्यात लोक या योजनेसाठी नाव सुचवतील. महत्त्वाचे असे की, सरकारची मदत केल्याबद्दल तुमचा फायदाही होणार आहे. या योजनेसाठी अर्थातच असंख्य नावे सूचवली जातील. मात्र, ज्या व्यक्तीने सूचवलेले नाव या योजनेसाठी निवडले जाईल. त्या व्यक्तीस केंद्र सरकार रोख बक्षिसही देणार आहे.


किती मिळणार बक्षिस?


सर्वात चांगले नाव सुचवणाऱ्या व्यक्तीस 25 हजार रूपये रोख मिळणार आहेत. तुम्हालाही या योजनेसाठी नाव सुचवायचे असल्यास आणि त्यासाठी आयोजित स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर सरकारने दिलेल्या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क करा. हे नाव सुचविण्यासाठी तुम्हाला min.wcd@gmail.com ईमेल आयडीवर संपर्क करायचा आहे. मात्र, त्यासाठी 15 डिसेंबर 2017 पर्यंतच मुदत असणार आहे.



काय आहेत नियम?


दरम्यान, नाव सुचवा बक्षिस मिळवा या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी सरकारने काही नियमही जाहीर केले आहेत. तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर, केवळ ईमेलच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. सुचविलेले नाव आक्षेपार्ह असू नये. या स्पर्धेत एक व्यक्ती केवळ एकच नाव पाठवू शकते. सुचवलेले नाव कोणत्याही प्रकारे कुठून कॉपी केलेले असू नये. तसेच, कोणाच्या कॉपिराईटचे भंग करणारेही असू नये.