COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तामिळनाडू :  तामिळनाडूमधल्या पंबनम सेतूवरील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. भरधाव वेगात असलेली ट्रेन थांबावावी लागल्याने अनेकांंच्या मनात प्रश्न उभे राहिले आहेत. पण चैन्नई एक्सप्रेस समुद्रात मध्येच का थांबवावी लागली याचं उत्तरही तितके खास आहे


का थांबली चेन्नई एक्सप्रेस 


प्रचंड वाऱ्यामुळे रामेश्वरममधली चेन्नई एक्सप्रेस थांबवावी लागली. रामेश्वरममधल्या समुद्रावर हा सेतू बांधण्यात आला आहे, याच सेतूवरुन ही ट्रेन जाते. बुधवारी इथे ताशी साठ किलोमीटर एवढ्या वेगानं वारे वाहात होते. अशा परिस्थितीत या सेतूवरुन ट्रेन नेणं धोक्याचं होतं. त्यामुळे काही काळासाठी या सेतूवरुन ट्रेनची वाहतूक थांबवण्यात आली. वाऱ्याचा वेग जेव्हा ताशी ५८ किलोमीटरपेक्षा वाढतो, त्यावेळी या सेतूवरचा सिग्नल आपोआप लाल होतो आणि वाहतूक थांबवली जाते.