नवी दिल्ली: भारतीय वायूदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना अत्यंत प्रतिष्ठेचा वीर चक्र पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. वीर चक्र हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यावेळी भारतीय वायदूलाच्या विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. यामध्ये अभिनंदन वर्थमान यांनी आपल्या मिग-२१ या विमानाच्या साहाय्याने मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांनी आपल्या मिग-२१ विमानाने अद्ययावत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ विमानाला धूळ चारली होती. 


यानंतर अभिनंदन वर्थमान यांचे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. मात्र, अभिनंदन यांनी तेव्हाही अत्यंत धैर्याने परिस्थितीचा सामना केला होता.


याच कामगिरीचा गौरव करण्यासाठी सरकार त्यांना वीर चक्र पुरस्कार देण्याचा विचार करत आहे. याशिवाय, बालाकोट एअर स्ट्राईकवेळी जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच वैमानिकांनाही वीर चक्र पुरस्कार देऊन गौरविले जाण्याची शक्यता आहे. 


अभिनंदन वर्थमान यांनी मिगच्या साहाय्याने एफ-१६ पाडल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा मोठा निर्णय


अभिनंदन यांच्याकडे मिग-२१ हे तुलनेने जुने आणि अगोदरच्या पिढीचे विमान असूनही त्यांनी एफ-१६ सारख्या विमानाला धूळ चारली. विशेषज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका पिढीतील विमानाने नव्या पिढीतील विमानाला पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे.


यापूर्वी वायूदलाने विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या मिग २१ बायसन स्क्वॉर्डनचाही गौरव केला होता. त्यानुसार  अभिनंदन यांची स्क्वॉर्ड्रन यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' या नावाने ओळखली जाईल. एफ-१६ या विमानाला फाल्कन या नावानेही ओळखले जाते. तर स्लेयर्सचा अर्थ वध करणारा असा होतो.


अभिनंदन वर्थमान यांच्या मिशांना 'राष्ट्रीय मिशीचा' दर्जा द्या- काँग्रेस


त्यामुळे मिग २१ बायसन स्क्वॉर्डनमधील जवानांच्या गणवेशावर 'फाल्कन स्लेयर्स'  आणि 'एमराम डोजर्स' हे दोन बिल्ले लावले जाणार आहेत.