संसदेच्या हिवाळी अधिवेशनात किती काम झालं? पाहा...
तारखा पुढे ढकलल्यामुळे सुरू होण्यापूर्वीच वादात अडकलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.
नवी दिल्ली : तारखा पुढे ढकलल्यामुळे सुरू होण्यापूर्वीच वादात अडकलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.
तिहेरी तलाक विधेयक रखडलं...
लोकसभेमध्ये मंजूर झालेलं मात्र राज्यसभेत रखडलेलं 'तिहेरी तलाकविरोधी विधेयक' हे या अधिवेशनाचं वैशिष्ट्य ठरलं. तिहेरी तलाकविरोधी विधेयक काँग्रेसमुळे रखडल्याचा आरोप अनंत कुमार यांनी केलाय. तर या विधेयकातल्या काही तरतुदींवर पक्षाचा आक्षेप असल्याचा खुलासा काँग्रेसनं केलाय.
२२ दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण १३ दिवस संसदेचं कामकाज चाललं. लोकसभेमध्ये ९१ पूर्णांक ५८ टक्के तर राज्यसभेमध्ये ५६ पूर्णांक २९ टक्के कामकाज झाल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केली. अधिवेशनात चांगलं कामकाज झाल्याबद्दल त्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.