Chingari Period Leave : आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे त्यानिमित्तानं आता महिलांसाठी (International Women's Day 2023) अनेक सवलतीही मिळू लागल्या असतील. सध्या सोशल मीडियावरही अशा प्रकारे अनेक सवलतींच्या बातम्या (Period Leave for Women) तुमच्यापर्यंतही पोहचल्या असतीलच. त्यातून आता अशीच एक खूशखबर तुम्हाला मिळणार आहे. सध्या मासिक पाळी आणि त्यानुसार मिळणारी सुट्टी हा सगळीकडेच चर्चाचा विषय आहे. काही कंपन्यांनी या सुट्टीचा विचार केला आहे तर काही कंपन्यांनी यावर महिलांना सुट कशी मिळेल यावर काम करायला सुरूवात केली आहे. तेव्हा सध्या अशाच एका कंपनीचा विषय सगळीकडे चर्चिला जातो आहे. ही कंपनी तुम्हाला मासिक पाळीच्या दिवशी सुट्टी (Holiday For Periods) देण्याचे घोषित केले आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला कसा होईल फायदा? (international women's day 2023 chingari company based in india announced period leave for two days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला दिनाच्या निमित्तानं सगळीकडेच जय्यत तयारी सुरू होती. त्यातून आता महिलांसाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम हे आयोजित केले जातात. ऑफिसेसमध्येही (Women's Day on Office) महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात येतात. परंतु सवलती मिळण्याच्या देण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न केले जातात. अशाच एका कंपनीच्या पुढाकारानं महिलांसाठी मासिक पाळीच्या (Periods and Women Health) निमित्तानं सुट्टीची सवलत दिली आहे. मासिक पाळी आणि आरोग्य हा सध्याचा महिलांपुढेचा आव्हानात्मक विषय आहे. काम आणि ऑफिस अशा धावपळीच्या युगात महिलांसाठी त्यांचे आरोग्य जपणंही फार महत्त्वाचं ठरलं आहे. सध्या अशाच एका कंपनीनं महिलांना खूशखबर दिली आहे. 


काय आहे सवलत?


चिंगारी या एका कंपनीनं आज महिला दिनाचे औचित्य साधून एक अभियान राबविले आहे. त्यानुसार यातून अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या निमित्तानं 2022 पासूनच त्यांनी ही प्रक्रिया राबविली होती. यातून अनेक महिलांना आर्थिक मदत त्याशिवया इतर आवश्यक सेवा सुविधाही पुरविल्या आहेत. या कंपनीच्या सीईओ ने यासंदर्भात माहिती दिली आहे. या कंपनीनं पिरियड लीव्ह (Period Leave for Two day) जाहीर केली आहे. त्याचसोबतच महिन्यातील दोन दिवस महिलांना ही रजा मिळेल. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे काम या कंपनीद्वारे केले जाते आहे. 


हेही वाचा - Gumraah Teaser Out: : गुन्हेगारी, रक्तपात आणि इंटिमेट सीन्सनं भरलेला 'गुमराह', पाहा टीझर...


तुम्हाला कसा होईल फायदा? 


अशा मासिळ पाळीच्या लिव्हचा महिलांना फार चांगला फायदा होऊ शकतो. मासिक पाळी आल्यावर अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो. त्यात काळात त्यांच्यात हार्मोनल चेन्जेसही (Hormonal Changes) होताना दिसतात. त्यामुळे अशा काळात त्यांना काम करणंही अशक्य जाऊ शकते. पहिले दोन दिवस हे महिलांसाठी त्यांच्या मासिक पाळीच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात. तेव्हा दोन दिवस त्यांना आराम मिळाला तर त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर होऊ शकते.