Wipro Bonus Shares: आयटी सेक्टरमधील लोकप्रिय कंपनी विक्रोच्या बोनस शेअरची एक्स डेट 3 डिसेंबर म्हणजेच आज आहे. कंपनीकडून शेअरहोल्डर्स साठी 1:1 बोनस शेअर जारी करण्यात आले आहेत. बोनस शेअर केल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट होणार आहे. परंतु शेअरचे व्हॅल्यू मात्र तेच राहणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, किंमत जुळवून फक्त शेअर्सची संख्या वाढणार आहे. परंतु तुमच्या शेअर्सचे एकूण मुल्य मात्र तेच राहणार आहे. शेअरची किंमत स्वस्त झाल्याने पुन्हा गुंतवणुकीची संधी मात्र निर्माण होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समजा एखाद्या व्यक्तीने 2009 साली आर्थिक मंदी असताना Wiproच्या शेअर्समध्ये 10,000 रुपयांची गुंतवणुक केली असेल तर आज त्यांच्याकडे जवळपास 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. कारण तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयांच्या जवळपास असेल. मात्र, या गुंतवणुकीत मल्टिपल रिटर्न कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? फक्त शेअरची किंमत वाढल्याने नाही तर Wipro कडून वेळोवेळी दिलेल्या बोनस शेअर्समुळंही वाढ झाली आहे. 


विप्रोने गेल्या 15 वर्षात चार वेळा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स दिले आहेत. या बोनस इश्यूमुळे गुंतवणूकदारांचे शेअर होल्डिंग अनेक पटींनी वाढले आणि लाँग टर्म वेल्थ क्रिएशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 


2010: विप्रोने 2:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले (प्रत्येक 3 शेअर्समागे 2 बोनस शेअर्स).
2017: 1:1 बोनस शेअर्स (प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर).
2019: 1:3 बोनस शेअर्स (प्रत्येक 3 शेअर्समागे 1 बोनस शेअर).
2024: 1:1 बोनस शेअर्स (प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर).
या बोनस शेअर्समुळे 2009 मध्ये खरेदी केलेले 200 शेअर्स 888 पर्यंत वाढले आहेत.


गुंतवणुकीचे गणित कसे असेल?


2009 मध्ये 10,000 ची गुंतवणुक = 200 शेअर्स (₹50 प्रति शेअर)
बोनस शेअर्सनंतर शेअर 888 पर्यंतने वाढले.
2024मध्ये विप्रोच्या शेअरची किंमत ₹ 584.55 इतकी असेल. त्यामुळं शेअरचे एकूण मुल्य 5,19,080 पर्यंत होईल. 


लॉन्ग-टर्म गुंतवणुकीची जादू


बोनस शेअर्स आणि शेअर्सच्या किमतीत वाढ या दोन्ही गोष्टी संपत्तीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. 


(Disclaimer : तुम्ही अशाप्रकार कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास जबाबदार राहणार नाही.)