रस्ता ओलांडताना महिलेचं भान हरपलं अन्... CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा
Woman Viral Video: व्हिडिओमध्ये महिलेने रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या बसकडे लक्ष दिलं नाही अन्...
Accident Viral Video: रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. दिल्लीतील करोलबाग परिसरात एक महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV Video) फुटेज आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडिओमध्ये महिलेने रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या बसकडे लक्ष दिलं नाही आणि बसचा चालकही महिलेला पाहू शकला नाही. त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. महिला न दिसल्याने ड्रायव्हरने बस तशीच सुरू ठेवली.
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्यावर वर्दळ पहायला मिळत आहे. एक हिरव्या रंगाचा टॅम्पो रस्त्याच्या बाजूला उभा आहे. तर एक सायकल रिक्षा देखील उभी असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे दुचाकी भरधाव रस्त्यावर दिसत आहेत. अशातच एक महिला रस्ता ओलंडण्याचा प्रयत्न करते. या महिलेने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय.
आणखी वाचा- Fire: प्लास्टिक कारखान्याला मोठी आग, काचा तोडून लोकांना काढले बाहेर; दोघांचा मृत्यू
रस्ता ओलांडत असताना महिलेचं लक्ष बसकडे जात नाही आणि बस चालकाचं लक्ष महिलेकडे गेलं नाही. त्यामुळे नजर हटी दुर्घटना घटी, असा प्रकार घडला. बसचालकाने महिलेला धडक दिली. त्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पाहा व्हिडीओ-
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. महिला शास्त्री पार्कमध्ये राहत होती आणि कॉल सेंटरमध्ये काम करत होती, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, पोलिसांनी बस ड्राव्हरला ताब्यात घेतल्याची माहिती देखील मिळाली आहे.