अनैतिक संबंधाची शंका, पत्नीने कापले पतीचे गुप्तांग
नव-याच्या कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या नव-याचे गुप्तांग कापून ते शौचालयात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालंधर : नव-याच्या कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या नव-याचे गुप्तांग कापून ते शौचालयात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पतीची प्रकृती गंभीर
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, जोगिंदर नगर येथे राहणारा आजाद सिंह पत्नीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय आणि एका स्थानिक रूग्णालयात जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. जालंधरचे सहायक पोलीस आयुक्त सतिंदर कुमार यांनी सांगितले की, सुखवंत कौर नावाच्या महिलेला तिच्या पत्नीवर दुस-या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळे महिलेने हे पाऊच उचलले.
झोपेतच केला वार
सहायक पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की, ‘महिलेने पतीवर झोपल्यावर लोखंडी रॉडने वार केला. तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तिने त्याचं गुप्तांग कापून ते शौचालयात फेकलं. रक्तस्राव अधिक झाल्याने सिंहला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. सिंहच्या वडीलांच्या तक्रारीवर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आजाद आणि सुखवंत यांना दोन मुलं आहेत.