Trending Video : महिलेचा धाडसाला सलाम! चाकूधारी दरोडेखोराला केलं सळो की पळो
Viral Video : तेवढ्यात बँकेतील एक कर्मचारी चोराला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पुढे जे झालं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल.
Bank Robbery Video : एटीएम (ATM) फोडी, दुकानांमध्ये (Shop) चोरी आणि घर (house) दरोडेखोरीचे अनेक व्हिडीओ (robbery videos) आपण सोशल मीडियावर (Social media) पाहिले आहेत. आजकाल सर्वत्र सीसीटीव्ही (CCTV) लावल्यामुळे अशा चोरीच्या घटना कॅमेऱ्यात कैद होतात. सशस्त्रसोबत असणाऱ्या चोरांची प्रत्येकाला भीती वाटते. अशावेळी आपण जीव जाण्याचा भीतीमुळे आपण चोरांना चोरी करण्यापासून रोखतं नाही. पण सोशल मीडियावर एक दरोडेखोराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
धक्कादायक व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अचानक एका बँकेत (Bank) दरोडेखोर मुखवटा घालून येतो. त्याला ती महिला विचारते काय काम आहे. तर तो तिला चाकू दाखवून धाक दाखवतो. ती महिला न घाबरता बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांना फोन करायला सांगते. तेवढ्यात बँकेतील एक कर्मचारी चोराला (Bank Robbery) थांबवण्याचा प्रयत्न करतो. पुढे जे झालं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. (Woman Employee Bravely Stopped Bank Robbery Video Viral on Social media nmp)
महिलेचा धाडसाला सलाम!
या महिलेच्या (Woman) धैर्याला सलाम, कारण ही मला त्या चाकू घेऊन आलेल्या चोराला एका पक्कडने सळो की पळो करुन सोडते. शेवटी त्या चोरा माघार घ्यावी लागते आणि तो तिथून पळून जातो. त्यानंतर तिने बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. चोराला पाहून आपल्याला घाम सुटतो अशात या महिलेच्या धाडसाचं जेवढं कौतुक करु तेवढं थोडं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोण आहे ही महिला?
ही धाडसी महिला बँक शाखा व्यवस्थापक असून तिचं नाव पूनम गुप्ता (Poonam Gupta) आहे. राजस्थानमधील (Rajasthan) गंगानगरमध्ये शनिवारी मरुधारा ग्रामीण बँकेतील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्रीगंगानगरमधील दावडा कॉलनीतील रहिवासी असून जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. बँकेच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी पोलिसांना अहवालही दिला आहे.