रॅलीत जाऊन दिला मोदींना पाठिंबा; घरी आल्यावर नवऱ्याने दिला तलाक
सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही. बरेलीतील एका मुस्लिम कुटूंबात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका पतीने आपल्या पत्नीला तलाक दिला आहे. कारण असे की, म्हणे ती, नरेंद्र मोदींच्या रॅलीत सहभागी झाली आणि तिने मोदींना पाठिंबाही दिला.
माध्यमातून आवाज उठताच अनैतिक संबंधांचा आरोप
दरम्यान, या प्रकरणाची प्रसारमाध्यमांतून चर्चा होऊ लागताच प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. पती-पत्नीने एकमेकांवर अनैतिकं संबंधाचे आरोप एकमेकांवर केले आहेत. पत्नीचे म्हणने असे की, तिच्या पतीचे चाचीसोबत अनैतिक संबंध आहेत. तसेच, तिला आपल्या पतीपासून मुलगाही झाला आहे. तर, पतीने म्हणने असे की, तिचे एका यूवकासोबत अनैतिक संबंध आहेत. तसेच, ती जिन्सही घालते.
रागाच्या भरात दिला तलाक
तीन तलाकचे हे विचित्र प्रकरण बरेलीतील इंग्लिशगंज परिसरातील आहे. इथे राहणाऱ्या दानिशने दोन दिवसांपूर्वी आपली पत्नी फयरा हिला तलाख दिला. त्यामुळे पत्नी फायराने पती आणि सासू-सासऱ्यांसह सात लोकांविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाविरोधी कायद्याखाली पोलिसांत तक्रार दिली आहे. पत्नीने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पत्नीने भांडणातून आलेल्या रागाच्या भरात पतीने तिला तलाक दिला. तसेच, दानिशने माहेरहून दहा हजार रूपये आणण्याबद्धल दबावही टाकला. तसेच, ते आणण्यास आपण नकार दिला. त्यामुळे त्याने आपल्याला मारहाणही केली.
पोलिसांना दिलेल्या जबाबपेक्षा वेगळा आरोप
दरम्यान, आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी महिला जेव्हा पोलिसांत गेली तेव्हा तिने पती, सासू सासरे आणि इतर सात जणांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तिचा जबाब घेतला तेव्हा तिने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत गेलो. तसेच, त्यांना पाठिंबा दिला त्याबद्धल आपला पती नाराज असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रसारमाध्यमांतून या प्रकरणाची चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र, दोघांनीही (पती-पत्नी) एकमेकांवर अनैतिक संबंधाचे आरोप लावले आणि प्रकरणाला वेगळे वळण द्यायचा प्रयत्न केला. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.