गडचिरोली : तेलंगणा राज्यातील जहाल महिला नक्षलीने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय. ज्योती पुडीयामी असं या नक्षलीचे नाव आहे. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस होते. तेलंगणा राज्यातील मंगी दलमची ती उपकमांडर होती. या कारवाईमुळे २०१८ या वर्षात नऊ नक्षलींनी आत्मसमर्पण केलंय. नक्षलींच्या आत्मसमर्पणामुळे नक्षलविरोधी चळवळ रोखण्यात पोलिसांना यश येत असल्याचे पाहायला मिळतंय. 


पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षल चळवळीला दणका बसलाय. त्यामुळे नक्षलवादी हादरलेत. दुसरीकडे गडचिरोलीच्या पेरमिली मार्गावरील आलदंडी गावाजवळ माओवाद्यांनी फलक धमकीचे फलक लावलेत. २२ एप्रिलला पोलिसांनी ३९ माओवाद्यांचा खात्मा केला होता. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करुन बदला घेण्याची धमकी या फलकाद्वारे देण्यात आलीय.