आधी पॅन्ट साफ करायला लावली मग कानशिलात; महिला हवालदाराच्या अरेरावीचा व्हिडीओ व्हायरल
रस्त्यावर उभे असलेले लोक महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हे गैरवर्तन पाहतच राहिले.
मुंबई : सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी एका तरुणासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणालाही या महिला पोलिस कर्मचारीचे हे वागणं आवडलेलं नाही. ही घटना मध्य प्रदेशातील रीवा या परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्यक्षात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला पोलिस तरुणासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. महिला पोलीस कर्मचारी आधी या तरुणाला तिची पँट साफ करायला लावते आणि ते करुन झाल्यानंतर मग ही महिला या तरुणाच्या जोरदार कानाखाली वाजवते आणि तेथून निघून जाते.
हा सगळा प्रकार घडत असताना रस्त्यावर उभे असलेले लोक महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हे गैरवर्तन पाहतच राहिले. तर एका व्यक्तीनी हा प्रकार आपल्या कॅमेरात कैद करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खरेतर हा तरुण त्याची दुचाकी काढत असताना या महिला पोलिसाच्या पॅन्टला चिखल लागतो. आपली पॅट खराब झाली हे पाहताच ही महिला कर्मचारी चिडली. ज्यामुळे आधी ही महिला त्या तरुणाला तिची पॅट व्यवस्थित साफ करायला लावले. हा तरुण या महिलेची पॅट साफ करताच. महिला पोलीस या तरुणाला कानाखाली वाजवते आणि तेथून निघून जाते.
हे सगळं घडत असताना तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शशिकला असे या महिला पोलिसाचे नाव आहे. ती जिल्हाधिकारी कार्यालयात होमगार्ड म्हणून तैनात आहेत. या संपूर्ण घटनेवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवकुमार (रीवा) यांचेही वक्तव्य आले आहे.
ते म्हणाले की, "आम्ही व्हिडीओ पाहिला आहे आणि असे दिसत आहे की या व्यक्तीला अधिकाऱ्याची पॅन्ट साफ करण्यास भाग पाडले गेले आणि ती त्याला कानाखाली देखील मारुन निघून गेली. जर कोणी आमच्याकडे तक्रार घेऊन आला तर आम्ही नक्की कारवाई करू."