तिरुवनंतपुरम: काही दिवसांपूर्वी केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश करून वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडीत काढणाऱ्या कनकदुर्गा यांना त्यांच्या सासूने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. कनकदुर्गा यांनी मंगळवारी पतीच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मी घरी परत आल्यानंतर सासूने काठीने मला मारले, असे कनकदुर्गा यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३४१ आणि कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. कनकदुर्गा यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शबरीमला वादात मुस्लीम धर्मियांनी जपलं सामाजिक भान


परंतु, कनकदुर्गा यांनीही प्रत्युत्तर म्हणून सासूला मारल्याचे समजते. त्यांची सासूही रुग्णालयात असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. आम्ही धार्मिक प्रथेचा आदर करत असल्याने कनकदुर्गा यांच्या मंदिरात प्रवेश करण्याला आमचा विरोध होता, असे त्यांच्या सासरच्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. कनकदुर्गा यांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले होते. 


२ जानेवारील कनकदुर्गा आणि बिंदू अमिनी या दोघींनी शबरीमला मंदिरात प्रवेश केला होता. यामुळे भक्तगण संतापले होते. त्यामुळे घरी परतताना या दोघींवर कट्टर हिंदूत्त्ववादी संघटनांकडून हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे या दोघी लपतछपत मंगळवारी आपापल्या घरी पोहोचल्या होत्या. 


शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या 'त्या' महिला म्हणतात...