Wommen Viral Video :  सरकारने पॅनला आधारशी लिंक (PAN Aadhaar Link) करण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पॅनला आधारशी लिंक नसेल तर त्वरित करा अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. 30 जूनपर्यंत तुम्ही पॅनला आधारशी लिंक करु शकता त्यानंतर तुम्हाला 10,000 हजार रुपये दंड भरावा लागेल. शिवाय सरकारच्या अनेक योजनांसाठी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही या योजनांपासून वंचित राहाल. अशातच एका बँकेतील महिलेचा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. (PAN Aadhaar Card Link Last Date)


अन् तिने सोडले केस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेतील (bank video) कामासाठी अनेक ग्राहकांना तासंतास रांगेत उभे राहवे लागते. अनेक वेळा तर वेळे अभावी त्यांचं काम होत नाही आणि त्यांना नुकसान सोसावे लागते. सोशल मीडिया बँकेत अशा एका कामासाठी गेलेल्या महिलेचा रौद्ररुप पाहिला मिळालं. झालं असं की, लाडकी बहना योजनेसाठी ही महिला बँकेत आधार लिंक करण्यासाठी गेली होती. रांगेत उभी असताना ती महिलेला विचित्र वागू लागली. तिने पहिले केस सोडले आणि अचानक आरडाओरडा करत नाचायला लागली. (Viral Video)


तिने सरकारला शाप दिला


विचित्र हातवारे करत ती नाचत होती आणि मग अचानक जमिनीवर पडली आणि जोरजोरात ओरडायला लागली. बँकेतील कर्मचारी आणि ग्राहक या महिलेच्या रौद्ररुप पाहून भयभीत झाले. बँकेतील कोणीतरी हा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या महिलेने दावा केला की तिच्या अंगात आलं होतं. (woman who went bank to link Aadhaar Due to delay Devi came into the woman body dancing in sbi madhya pradesh video viral on Social media Trending news)


तिचं आधार लिंक न झाल्यामुळे लाडली बहना योजनेसाठी उशीर झाल्यामुळे तिच्या अंगात देवी आली असं तिचं म्हणं आहे. यावेळी तिने सरकारला शापसुद्धा दिला. या सर्व गोंधळानंतर ती शांत झाली. हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील एसबीआयच्या शाखेतील आहे. 


शिवराज सिंह चौहान सरकारने महिलांना आर्थिक सहायता करण्यासाठी लाडली बहना योजना आणली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, ''माझा संकल्प आहे, माझ्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू नाही तर चेहऱ्यावर हसू असेल.'' 




याच व्हिडीओला एका यूजरने रिप्लाय देण्यासाठी बँकेतील महिलेचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्वीटरवर MP Youth Congress या अकाऊंटवर हा व्हिडीओ आहे.