तिरुवअनंतपुरम : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी फक्त शुभेच्छा आणि भेटवस्तूंपुरताच मर्यादित न राहता एका अनोख्या मार्गाने हा दिवस साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत पोलीस ठाण्याचा ताबा घेण्यापासून ते अगदी रेल्वेचा कारभार सांभाळण्यापर्यंतची सर्व कामं महिला करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला सबलीकरणाच्या दृष्टीने kerala केरळमध्ये हे पाऊल उचलण्यात आलं आहे. केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी जिल्हा पोलीस ठाण्याच्या प्रबंधकांना सर्व कारभार हा ८ मार्चच्या दिवशी महिला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यास सांगितला आहे. 


'सर्वाधिक पोलीस ठाण्यांमध्ये सर्व कारभार या महिला 'स्टेशन हाऊस ऑफिसर' पाहतील. त्या नागरिकांशी संवाद साधून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर तोडगा काढतील', असं ते म्हणाले. 


याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याची जबाबदारीही महिला कंमांडो पाहणार आहेत. त्याशिवाय नॉर्थ ब्लॉक येथे असणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयाच्य सुरक्षिततेची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. संरक्षणासोबतच रेल्वे वाहतुकीचा संपूर्ण ताबा महिलांच्या हाती असणार आहे. एर्नाकुलम येथून सुटणारी 'वेनाड एक्स्प्रेस'ही महिला मोटरचालिका चालवणार आहेत.  



...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी


लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, पॉईंट्मेन, गेटकिपर आणि ट्रॅकवूमन अशा सर्व पदांच्या जबाबदाऱ्या महिला पाहणार आहेत. शिवाय तिकीट आरक्षण खिडकी, माहिती कक्ष, सामान कक्ष या साऱ्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. याव्यतिरिक्त रेल्वे सुरक्षिततेची जबाबदारीही या महिला अधिकाऱ्यांवर आहे. सर्वाधिक साक्षरतेचा दर असणाऱ्या केरळ राज्यात महिला दिनाच्या निमित्ताने उचलण्यात आलेलं हे पाऊल इतर सर्वच राज्यांसाठी आदर्श प्रस्थापित करत आहे, असं म्हणाला हरकत नाही.