विजय सुर्वे, झी मीडिया, मुंबई : आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा आणि धक्कादायक प्रकाराच्या आतापर्यंत अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र या घटनेने कळसचं गाठला आहे. एका जखमी महिलेची ड्रेसिंग करताना कापसाऐवजी कंडोमच्या पाकिटाचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना समोर आल्यानंतर नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. तसेच या घटनेनंतर आता आरोग्य केंद्रातील संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरतेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावातील ७० वर्षीय रेशमीबाई या घरात झोपल्या होत्या. या दरम्यान छतावरून एक वीट कोसळून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघतात त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला होता. प्राथमिक उपचारासाठी त्यांना पोरसा य़ेथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. यावेळी आरोग्य केद्रातील कंपाऊंडरने रक्तस्त्राव रोखण्यासाठी डोक्याला कंडोमचं पॅकेट लावून ड्रेसिंग केली होती. महिलेचा प्रकृती गंभीर असल्याने तिला मुरैना जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. 


जिल्हा रूग्णालयात पोहोचताचं महिलेची ड्रेसिंग काढण्यात आली होती. ही ड्रेसिंग काढताना कापसाऐवजी रिकाम्या कंडोमच्या पाकिटाचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार पाहताचं जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरचं आश्चर्यचकित झाले होते. या घटनेनंतर पोरसा आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा समोर आला होता. पोरसा रुग्णालयात ना मलमपट्टीची, ना कापसाची कमतरता नसताना, जखमेवर पट्टी-कापसाऐवजी कंडोमचे रिकामे पाकीट का बांधण्यात आली? असा सवाल आता उपस्थित होतोय. तसेच आरोग्य सेवेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे. 



मध्यप्रदेशच्या मुरैना य़ेथील ही घटना समोर आल्यानंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नरोत्तम भागव यांनी संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या घटनेनंतर जिल्हा रूग्णालयात महिलेवर ड्रेसिंग करून तिच्यावर आता उपचार सुरु आहेत.