उत्तरप्रदेश : बुंदेलखंडातील ललितपूरमध्ये दलित महिलांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या एका 'कुप्रथेला' झुगारून लावलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च जातीच्या लोकांसमोर आणि घरातील-गावातील मोठ्या लोकांसमोर कोणत्याही स्त्रीला चप्पल घालून वावरण्याची परवानगी नव्हती... गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू होती... उन्हाळा असो की पावसाळा... पुरुष किंवा उच्च दर्जाचे लोक समोर आले की महिलांना आपल्या पायातील चप्पला काढून त्या हातात घ्याव्या लागत असत. इतकंच काय तर आपल्या घरातील मोठ्या पुरुषांसमोरही चप्पल परिधान करण्याचा त्यांचा हक्क नाकारण्यात आला होता. 


परंतु, बदलत्या काळानुसार महिलांनी ही कुप्रथा झुगारून लावलीय. गावातील अनेक तरुण सुशिक्षित आहेत... त्यांनीही जाती-पाती बाजुला सारत स्त्री-पुरुष समानताही स्वीकारायला सुरूवात केलीय.