मुंबई : जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वांनाच धक्का देणारं प्रकरण समोर आलं आहे. जिथं एका आफ्रिकन महिलेनं गुप्तांगामध्ये (रेक्टम) मध्ये अमली पदार्थ भरून ती त्याची तस्करी करत असल्याची बाब उघड झाली. (Drugs Case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी डीआरआईच्या टीमनं या महिलेला ताब्यात घेतलं. पण, तरीही त्यांना महिलेकडे असणारे अमली पदार्थ ताब्यात घेता आले नव्हते. 


पुढील कारवाई करत त्यानंतर या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे तिच्या गुप्तांगातून जवळपास 60 कॅप्स्युल बाहेर काढण्यात आले. मुख्य म्हणजे या महिलेनं रेक्टममध्ये आणखीही कॅप्स्युल लपवल्याचं म्हटलं जात आहे. 


यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे अतिशय जास्त किंमतीला विकले जाणारे आहेत दिल्लीतून यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 


महिलेनं तस्करी करत आणलेल्या या अमली पदार्थांची किंमत तब्बल 16 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. 


सदर महिला ही युगांडाची रहिवाली असून, तिचं वय 32 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. या महिलेला सध्या सवाई मानसिंह रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. तिथं तिच्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. 


अमली पदार्थांची तस्करी केली जाण्यची किंवा ही तस्करी पकडली जाण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली. 


यंत्रणा आणि कायदे इतके कठोर करण्यात आले असूनही अशा प्रकारे गैरव्यवहार करणारे मात्र वठणीवर येत नाहीत, हीच शोकांतिका वेळोवेळी दिसून येते.