Viral Video : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि गोंधळ हे आता एक समीकरणच झालंय. रोज दिल्ली मेट्रोत काही ना काही गोंधळ होतच असतो. कधी मेट्रोत बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसोबत होणारी गैरवर्तणूक किंवा रिल्स तयार करणे असो अशा विविध कारणांनी दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते. अशातच एका महिला प्रवाशाच्या बाचाबाचीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. या ताज्या प्रकरणात एका महिलेचा एका तरुणीसोबत जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
डीएमआरसीच्या इशाऱ्यांनंतरही दिल्ली मेट्रोमध्ये नाचणे, गाणे, हाणामारी आणि गोंधळ सुरुच आहे. यापूर्वी तर मेट्रोमध्ये अश्लिल कृत्य करतानाचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दिल्ली मेट्रोमधील दोन महिलांचे भांडण सध्या जोरदार चर्चेत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला उभी राहून भांडत आहे तर समोर एक मुलगा आणि मुलगी खाली बसलेली आहे. महिला बसण्यासाठी मुलीला थोडीसे सरकायला सांगते. त्यावरुनच दोघांमध्ये भांडण होते आणि दोघांमध्ये वाद होतो. ती महिला तू मला पागल कसा म्हणालास? असे ओरडत असते. महिलेची आरडाओरड पाहून मुलगासुद्धा भडकतो आणि उठून उभा राहतो आणि मी तुला थोडीच म्हणालो असे म्हणतो. त्यावर मुलासोबत असलेली तरुणी त्याला शांत राहायला सांगते. तितक्यात महिला तू काय करशील असे त्याच्यावर ओरडते.


यानंतर दोन्ही महिला एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून भांडू लागतात. उभी असलेली महिला त्या मुलासोबत असलेल्या मुलीला, तू तुझ्या आई-वडिलांशी खोटे बोलून मुलासोबत फिरते आहेस, असेही म्हणताना दिसत आहे. दरम्यान समोरच्या सीटवर बसून कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे.



याआधीही झाली होती हाणामारी


मेट्रोमध्ये घडणाऱ्या या विचित्र घटनांचे व्हिडिओ वारंवार व्हायरल होत असतात. नुकताच मेट्रोचा असाच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला होता. यानंतर एका महिलेने आरडाओरडा करत दुसऱ्या महिलेला मोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या महिलेचे बोलणे ऐकून इतर महिलेलाही राग आला. मी तिला जोड्याने मारीन असे महिलेने म्हटलं होतं. प्रत्युत्तरात दुसऱ्या महिलेने, 'चपलीने मारू नको, बेल्टने,  गोळीने मार. चपलांचे युग गेले, कोणत्या युगात जगत आहेस? असे म्हटलं होतं.