चेन्नई : सुपरमार्केटमध्ये तुम्ही अनेकांना वस्तू चोरतांना पाहिलं असेल. पण चेन्नईच्या एका सुपरमार्केटमध्ये एका महिला पोलिसाने चक्क चोरी केली आहे. ही घटना बुधवारची आहे. या घटनेनंतर त्या महिलेला जेव्हा रंगे हात पकडलं तर त्या महिलेने घरी जाऊन आपल्या पतीला पाठवलं. त्यानंतर महिलेच्या पतीने काही मित्रासोबत मिळून सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईमधील चेटपेट भागातली ही घटना आहे. ही महिला फोनवर बोलत बोलत सुपरमार्केटमध्ये आली. नंदिनी ही वेपेरी पोलीस स्थानकात कार्यरत आहे. फोनवर बोलत असताना तिने चॉकलेट उचलल्या आणि खिशात टाकल्या. ही सर्व घटना सुपरमार्केटचे मालक प्रणवने सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिली आणि त्या महिलेला पकडलं.



नंदिनीने यानंतर लेखी माफी मागितली. महिलेने म्हटलं की ती परत असं करणार नाही. तिने स्विकारलं की, 115 रुपयांचं ओडोमास, 5 स्टार, जेम्स चोरी केल्या. पण अपमान झाल्याने घरी जावून महिलेने आपल्या पतीला सुपरमार्केटमध्ये पाटवलं.


महिला पोलिसाचा पती दिनेश आपल्या काही मित्रांना घेऊन सुपरमार्केटमध्ये आला. त्यानंतर प्रणव आणि सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यावर त्यांनी हल्ला केला. प्रणव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतलं आहे. नंदिनी विरोधात देखील पोलीस कारवाई करणार आहे.