मुंबई : 'थोडं शिफ्ट व्हा, बॅग मांडीवर ठेवा...' अशी वाक्य आपण रोज मुंबईच्या लोकलमध्ये ऐकतो. विशेष म्हणजे महिलांच्या डब्यात. तुम्ही जर ट्रेनने प्रवास करात असाल तर तुम्हाला हे नवीन नाही. मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल, महिला आणि धावत्या लोकलमध्ये अनोळखी दोन महिलांमध्ये उडणारे खटके...आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येका घाई असते. त्यात जर ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळाली नाही किंवा जागा असून कोणी बसू दिलं नाही तर  प्रचंड राग येतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे व्हायरल होत असलेला व्हिडीओ लोकल मधील नसून दिल्लीतील मेट्रोमधील आहे. मेट्रोमध्ये जागेवरून झालेलं दोन महिलांमध्ये भांडण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. पाहा व्हिडीओ. 



व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका युजरने 'प्रत्येक जण भांडण पाहण्यात व्यस्त आहे. पण कोणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाही..' अशी कमेंट केली आहे.