मुंबई : आताही आपल्याकडे शारीरिक संबंधांबाबत (Physical Realtion) उघडपणे बोलणं टाळलं जातं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की अजुनही तारूण्यात आलेल्या मुला-मुलींना माहित नसतात त्यामुळे सेक्स एज्युकेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. कॉलेजमध्ये असताना काही तरूण-तरूणी शारीरिक संबंध ठेवतात, मात्र काही कारणांवरून त्यांचं प्रेम हे लग्नापर्यंत जात नाही. दुसऱ्या कोणासोबतच लग्न होतं याचा परिणाम असा होतो की ते त्यांच्या मनातील भावना जोडीदाराला मनमोकळेपणाने सांगत नाहीत. अशी अनेक गुपित ही जी महिला आपल्या पतीपासून हमखास लपवून ठेवतात. (Women hide these things about physical relations from their husbands)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही गोष्टी अशा असतात ज्या पत्नी पतीला सांगणं टाळतात. गुप्तता ठेवणं नेहमीच शहाणपणाचं नसते परंतु कधीकधी काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असतात. बऱ्याच महिला काही गोष्टी स्वतःकडे ठेवतात. जेव्हा लैंगिक संबंधाची गोष्ट येते तेव्हा स्त्रिया त्यांच्या विचार आणि भावनांबाबत नेहमीच पारदर्शक नसतात. अशी काही गुपिते जी बायका आपल्या पतीला कधीच सांगत नाहीत.


आधीच्या जोडीदारासोबतचे लैंगिक संबंध
महिला त्यांच्या पतींना आधीच्या जोडीदारासोबतच्या लैंगिक संबंधांबाबत सांगणं टाळतात. स्त्रियांना असं वाटते की त्यांचे पती त्यांच्या पत्नीच्या पूर्वीच्या जोडीदारांसोबत लैंगिक संबंध कसे होते याबद्दल खूप असुरक्षित होऊ शकतात. लैंगिक संबंधांमधील असुरक्षितता ही खरी समस्या असू शकते.


प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीला हस्तमैथुन करण्याबद्दल सांगणे त्यांना सोयीचे वाटत नाही. तसेच लहान वयात केलेल्या चुकाही त्या पती पासून लपवतात. बहुतेक महिलांना हे गुपित ठेवायला आवडतं. जग दिवसेंदिवस याबद्दल जागरूक होत असलं तरी महिलांमध्ये हस्तमैथुन हे मुख्यत्वे निषिद्ध मानलं जातं.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)