मथुरा : अनेकदा लोकांना आपल्या मर्जी विरुद्ध आपल्या आई-वडिलांसाठी लग्न करावं लागलं. परंतु असे बळजबरीने किंवा इच्छे विरुद्ध केलेलं लग्न फार काळ टिकत नाही. बऱ्याचदा असे बळजबरीने लग्न केल्याने लोकं वाईट मार्गाला जातात आणि गुन्हे करतात. ज्यामुळे अनेक लोकांना त्यांची चुक नसताना आपला जीव गमवावा लागतो किंवा अनेकदा लोकं मोठ्या कोणत्यातरी प्रसंगात अडकतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात घडली आहे. येथे एक महिल विवाहामुळे नाखूष असल्येने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला अडकवण्याचा कट रचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कटामुळे तिचा नवरा तुरुंगात गेला असता आणि तिचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यामुळे ती आपल्या प्रियकरा सोबत फिरण्यास मोकळी झाली असती. परंतु एका मोबाईल फोनमुळे पोलिसांसमोर या महिलेचा कट उघडकीस आला.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अलीगडच्या पोलिस स्टेशन अंतर्गत राहणारी ही महिला नोएडामध्ये नोकरी करत होती. त्यावेळी विकास नावाच्या व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध होते. परंतु आई-वडिलांमुळे या महिलेला कोसीकलां येथील रहिवासी असलेल्या दुसर्‍या युवकाशी लग्न करावे लागले.


परंतु तिला आपल्या प्रियकरासोबत राहायचे होते. ज्यासाठी तिने पतीला तुरुंगात पाठवण्याचा प्लॅन केला आणि आपल्या प्रियकराला तिच्या नवऱ्याच्या गाडीत अवैध पिस्तूल ठेवून, त्याला पोलिसांकडून अटक करण्याचा कट रचला. पण तिचा प्लॅन फसला. यामुळे तिच्या प्रियकरावर तुरुंगात जाण्याची वेळ आली.


पोलिसांना असा संशय आला
कोसीकलां पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद पवार म्हणाले, "रविवारी गौतम बुध नगर जिल्ह्यातील दानकौर पोलिस ठाण्यातील कानलसी खेड्यातील रहिवासी विकास नगर याने कोटवण पोलिस चौकीला एका गाडीचा नंबर दिला आणि माहिती दिली या गाडीतून एका युवक त्याच्या बायकोसोबत बेकायदेशीर पिस्तूल घेऊन प्रवास करत आहे."


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लगेचच त्या कारला शोधून काढले आणि कारचा तपास केला. तपासात पोलिसांना ती पिस्तूल सापडली. पोलिसांनी पती-पत्नीलाला पिस्तूल बद्दल विचारले असता, दोघांनाही याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.


परंतु महिलेच्या बोलण्यावरुन पोलिसांना तिच्यावर संशय आला. म्हणून पोलिसांनी तिचा मोबाईल फोन तपासला. त्या महिलेचा फोन तपासल्यानंतर पोलिसांनासमोर सगळं प्रकरण उघड झालं.


कारण, त्यामध्ये पोलिसांना तक्रारदाराचा म्हणजे विकासचा फोन नंबर सापडला. ज्याने थोड्या वेळापूर्वी पोलिसांना या घटने विषयी माहिती दिली. या नंबरवर बर्‍याच दिवसांपासून या महिलेचे बोलण्याचे सुरू होते. फोनच्या मागील रेकॉर्डमध्ये ते दोघे ही जास्त काळ एकमेकांच्या संपर्कात असल्याचे त्यांना आढळले. यानंतर पोलिसांनी या दोघांची कडक चौकशी केली असता, त्यांनी आपली चुक मान्य केली.


पवार म्हणाले की, विकासवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) 203, 211, 120 (बी) आणि 25 नुसार तसेच अवैध्य शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


त्याचबरोबर षडयंत्र रचणारी महिला आणि त्याना मदत करणाऱ्या काशीवर देखील भारतीय दंड संहितेच्या कलम  203, 211 आणि 120 (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.