Work From Homeमुळे कर्मचाऱ्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम? सर्वेक्षणातून समोर
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
मुंबई : कोरोना महामारीमुळे फक्त आर्थिक नुकसान झालं नाही तर प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये देखील मोठे बदल झाले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पण वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल जीवनावर मोठा परिणाम झाल्याचं एका संशोधनातून समोर आलं. संबंधित सर्वेक्षणात 59 टक्के पुरुष कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की कामाच्या दबावामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य प्रभावित होत आहे.
जॉब साइट स्कीकी मार्केट नेटवर्कच्या सर्वेक्षणानुसार आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तेव्हा शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पण वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षणात 59 टक्के पुरूष तर 56 टक्के महिलांचा समावेश होता. 59 पुरूषांच्या म्हणण्यानुसार कामाच्या दबावामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्य प्रभावित होत आहे.
तर 56 महिलांचं देखील देखील हेच म्हणणं आहे. सर्वेक्षणानुसार घरातून काम करत असताना कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आणि दबाव अधिक येत आहे. अशात प्रत्येकाच्या मनात नोकरी जाण्याची शक्यता देखील फार मोठी आहे. देशातील महानगरांमध्ये 20 ते 26 जून दरम्यान स्केकी मार्केट नेटवर्कने हे सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण केलेल्या पुरुषांपैकी फक्त 23 टक्के लोकांनी सांगितले की ते कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणाविषयी त्यांच्या वरिष्ठांवर ते विश्वास ठेवू शकता.
सर्वेक्षण केलेल्या 20 टक्के पुरुषांचा असा विश्वास आहे की त्यांना कामाच्या ठिकाणी पाठिंबा मिळत नाही. अशा विचार करणार्या महिलांची संख्या 16 टक्के होती. सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या दबावाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यामधील 30 टक्के लोकांना कामादरम्यान येणारा दबाव मुख्य कारण सांगितलं, तर 25 टक्के लोकांनी कामाप्रती अपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं आहे.