प्रवासाचा वेळ कामाच्या वेळेत मोजावा, 61 टक्के नोकरदारांची मागणी
`प्रवासाचा वेळ हा कामाच्या वेळेत धरावा` अशी मागणी मुंबईसह देशभरातील 61 टक्के नोकरदारांनी केली
सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : नोकरीच्या ठिकाणी पोहण्यासाठी मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर अशा शहरांत जाणे म्हणजे अनेक सामान्यांसाठी अग्निदिव्य असते. कामाव्यतिरिक्त किमान दोन तास प्रवास करणारी मंडळी अनेक आहेत. जर आमचा प्रवासाचा वेळ कामाच्या वेळात मोजला गेला तर काम करणं सोप्पं होईल असे अनेकांच मत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर असा नोकरदारांचा प्रवास अनेकांसाठी तारेवरची कसरत असते. घराबाहेर पडताना वेळेत नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी लोकल ट्रेन,बस, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला जातो. काही लोक खाजगी वाहन वापरत असले तरी ट्रॅफिक, ट्रेन, बसचा अनियमितपणा अशा अडथळ्यांची शर्यत पार करत कार्यालयात पोहचतात. एवढे करूनही लेटमार्कच टेन्शन कायम असतं. त्यामुळे 'प्रवासाचा वेळ हा कामाच्या वेळेत धरावा' अशी मागणी मुंबईसह देशभरातील 61 टक्के नोकरदारांनी केली आहे.
कामाच्या ठिकाणी करावी लागणारी पायपीट अनेकांना आपल्या कुटुंबापासून दूर नेत आहेत. ८-१० तास काम आणि त्यानंतर ३ तास प्रवास त्यांच्या मानसिक आणि शरीर स्वास्थ्य खराब करत आहे. महीला वर्गात तर या ना केवळ कार्यालयात तर घरी जाऊन देखील काम करता ज्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे महीला कर्मचारी वनिता शिंदे सांगतात.
'इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रूप'ने (आयडब्ल्यूजी) केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारतात कार्यालयामध्ये जाणार्या 61 टक्के लोकांनी प्रवासाचा वेळ हा कामाच्या वेळेचाच भाग म्हणून ग्राह्य धरला जावा, असे मत नोंदवले. देशातील 80 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कर्मचारी टिकवण्यासाठी कामाच्या वेळा लवचिक ठेवल्याचे सर्वेक्षण म्हटले आहे.
काय आहे सर्वेक्षण ?
आयडब्ल्यूजी’ने केलेल्या सर्वेक्षणात 80 देशांतील 15 हजार कर्मचार्यांनी मते नोंदवली.
पाचपैकी दोन जणांनी प्रवासाचा वेळ हा कामासंदर्भातील भाग असल्याचे म्हटले
कर्मचार्यांच्या कामाची वेळ त्यांच्या सोयीची ठेवल्याचा फायदा कंपन्यांना होतो, असे85 टक्के उद्योजकांचे मतं
कामाच्या वेळा शिथील केल्यामुळे बाळंतपणानंतर कंपनी सोडून जाणार्या महिलांचे प्रमाण घटले
सोयीच्या वेळा दिल्यामुळे कर्मचारी कामावर येताना उत्साही आणि ताजेतवाने असतात.
माणूस कुटुंबासाठी आणि पोटासाठी वणवण भटकत काम करतो परंतु शहरी भागात काम करताना रोजची धावपळ रोजची गर्दी ही तारेवरची कसरत मात्र कायम