जागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?
नुकतंच `सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस`नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
नवी दिल्ली : नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
परंतु, जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार महत्त्वकांक्षी मोदी सरकारमध्ये होत असलेल्या व्यापक सुधारणा उपायांसहीत भारतामध्ये जगातील इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थेंच्या तुलनेत अधिक क्षमता आहे.
विकास दराचा अंदाज
जागतिक बँकेनं बुधवारी २०१८ साठी भारताचा विकास दराचा अंदाज जाहीर केलाय. यात भारतचा विकास ७.३ टक्क्यांवर राहू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. इतकंच नाही तर जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, भारत येत्या दोन वर्षांत ७.५ टक्क्यांच्या दरानं पुढे पावलं टाकू शकतो.
जागतिक बँकेनं २०१८ ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट जाहीर केलंय. यानुसार, नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या जोरदार झटक्यानंतरही २०१७ मध्ये भारताचा विकास दर जवळपास ६.७ टक्के राहू शकतो.
चीनचा विकास दर घसरणार?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताचे गेल्या तीन वर्षांचे विकास दराचे आकडे चांगले र्आहेत. अहवालानुसार, २०१७ मध्ये चीन विकास दरात ६.८ टक्क्यांच्या गतीनं पुढे सरकलाय... हा आकडा भारताच्या तुलनेत केवळ ०.१ टक्क्यांनी अधिक आहे. २०१८ मध्ये चीनमध्ये ६.४ टक्के विकास दर राहू शकतो... तर येत्या दोन वर्षांसाठी हा अंदाज घटवून अनुक्रमे ६.३ आणि ६.२ टक्के वर्तवण्यात आलाय.