Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो आवडतात? तसं तुम्हालादेखील जमू शकतं असं वाटतं का? मग काळजी करु नका. 5 मे हा जागतिक हास्य दिवस आहे. यानिमित्ताने आपण स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअर कसं करायचं? किती कमाई होते? याबद्दलची माहिती घेऊया. आता तुम्हाला कोणी भारतातील कॉमेडियन्सची नाव विचारली तर तुम्ही कपिल शर्मा, भारती सिंग अशी 10-12 नाव चटकन सांगाल. पण गेल्या दशकात अशी परिस्थिती होती का? तर नाही. कारण आता सोशल मीडिया आणि इंटरनेट वेगाने पसरतंय. सोबत लोकांना हसवणाऱ्यांचे व्हिडीओही ट्रेण्डमध्ये असतात. 


भारतात कॉमेडीचा विस्तार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात स्टॅण्डअप कॉमेडीचा विस्तार जोराने होतोय. ओपन माईक, लाफ्टर क्लब सारख्या अनेक मंचावर आपण लिहिलेले जोक्स लोक ऐकवतात. सेंस ऑफ ह्युमर आणि हजरजबाबी असाल तर या क्षेत्रात करिअर करु शकता. यानंतर पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही तुमच्याकडे असतील. लोक नोकरी सोडून या क्षेत्रात येऊ लागली आहेत. याची सुरुवात कशी करायची? जाणून घेऊया. 


कशी कराल सुरुवात?


छोटासा पॅरेग्राफ लिहण्याने सुरुवात करा. किमान 5 मिनिटांसाठी जोक्स लिहा. यानंतर प्रेझेंटेशनवर काम करा. अनेक शहरांमध्ये ओपन माईक संकल्पान रुजतेय. येथे सादरीकरण करुन तुम्ही स्वत:चा आत्मविश्वास वाढवू शकता. 


ऑडियन्समध्ये राहा 


तुम्ही एकटे असताना जोक्स लिहू शकता. पण ते लोकांना आवडतायत का हे पडताळण्यासाठी तुम्हाला लोकांमध्येच जावे लागेल. जितका जास्तवेळ तुम्ही ऑडियन्समध्ये असाल तितका चांगला परफॉर्मन्स देऊ शकाल. 


हेही वाचा- मुलाखतीवेळी 8 चुका अजिबात नका करु


एनर्जी कायम ठेवा


कितीही चांगले जोक्स असतील पण एनर्जी लेव्हल तुम्हाला राखता आली नाही तर काही उपयोग नाही. यामुळे टायमिंग साधा, पूर्ण स्टेजचा उपयोग करा.  जास्तीत जास्त एनर्जी दाखवण्याचा प्रयत्न करा. यामुळे लोकांचे लक्ष तुमच्याकडे खेचले जाईल. 


कोणाचे जोक्स चोरु नका


स्टॅंपअप दरम्यान काय करता कामा नये, हे जाणून घ्या. सर्वात पहिलं म्हणजे कोणाचे जोक्स चोरु नका. किंवा उधारीवर घेऊ नका. जोक्स किंवा आयडिया चोरण तुम्हाला फ्लॉप करु शकतं. तुमचा सेट तुम्ही स्वत: लिहा. स्वत:ची स्टाईल निर्माण करा. हळुहळू लोकांना ती आवडू लागेल. 


हेही वाचादहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नकाच


तब्येतीकडे लक्ष द्या


स्टॅंड कॉमेडीयन सुरुवातीला नोकरीधंदा संभाळून या क्षेत्रात उतरत आहेत. अशावेळी ते काम, कॉमेडीच्या दुहेरी दबावात असतात. त्यामुळे पूर्ण झोप घेऊ शकत नाहीत. अशावेळी तुमचं मॅनेजमेंट योग्य असणं आवश्यक आहे. झोप पूर्ण घ्या. अन्न पोटभर खा. नियमित व्यायाम करा. स्टेजवर जाताना उर्जा सोबत घेऊन जा.


जोक्स पोस्ट करत राहा


सोशल मीडियाचा विस्तार झालाय. लोकांच्या हातात फोन आलाय. त्यामुळे स्टॅण्डअप कॉमेडीयन झाल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत पोहोचायचंय. सोशल मीडियावर जोक्स पोस्ट करत राहा. 


स्टॅण्डअप कॉमेडियनची कमाई


स्टॅण्डअप कॉमेडियनची कमाई त्यांच्या स्टारडमवर ठरते. बार आणि कॅफेमध्ये स्टॅण्ड कॉमेडीयन्सना 10 ते 15 मिनिटाच्या शोसाठी साधारण 10 हजार रुपये आकारतात. तर कॉर्पोरेट शोमध्ये सादरीकरणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत फी घेतात. सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असाल तर प्रमोशनल पोस्टसाठी लाखभर रुपये मिळतात. 


हेही वाचायुट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावणं खूपचं सोपं! 'हा' क्रायटेरिया पूर्ण करुन व्हा श्रीमंत