जगातील सर्वात मोठे Cargo Plane मदतीचे सामान घेऊन भारताकडे रवाना
कार्गो विमान(World’s Largest Cargo Plane) मदत सामग्रीसह नवी दिल्लीकडे रवाना
लंडन : कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्यासाठी जगातील सर्वात मोठे कार्गो विमान(World’s Largest Cargo Plane) मदत सामग्रीसह नवी दिल्लीकडे रवाना झाले आहे. विमानात 18-टन ऑक्सिजन जनरेटर आणि एक हजार व्हेंटिलेटर आहेत. ब्रिटिश सरकारने(UK Government) याबद्दल माहिती दिली. तसेच संकटांच्या या वेळेत आम्ही भारताच्या सोबत असून शक्य तितकी मदत पुरविली जाईल असेही ते म्हणाले. शुक्रवारी या विमानाने उत्तर आयर्लंडहून भारतासाठी उड्डाण केले.
प्रत्येक 18 टन ऑक्सिजन जनरेटरमध्ये एका मिनिटात 500 लिटर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असते. अशाप्रकारे ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करणाऱ्या भारताची समस्या बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते. रात्रभर मेहनत घेत विमानतळ कर्मचार्यांनी जीवनरक्षक औषधे जायंट अँटोनाव 124 विमानात भरली अशी माहिती परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (FCDO) अहवाल दिली.
एफसीडीओने या पुर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. एफडीसीओच्या म्हणण्यानुसार हे विमान रविवारी सकाळी आठ वाजता दिल्लीला पोहोचेल. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने येथून रूग्णालयात हा पुरवठा केला जाईल. यापूर्वी ब्रिटनने भारताला 200 व्हेंटिलेटर आणि 495 ऑक्सिजन कंसेट्रेटर दिली होती.
कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारताला सर्वतोपरी मदत पुरविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कोरोनाच्या भारतातील बिघडत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. अमेरिका, ब्रिटनसह सर्व देश या साथीच्या लढाईत भारताला मदत करीत असल्याचे ब्रिटनने म्हटले होते.