तुम्हाला मूनलायटिंग करायला आवडेल का? जाणून घ्या सर्वकाही...
मूनलायटिंग करायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Moonlighting : सध्याच्या महागाईच्या जगात कमाईचे विविध स्रोत असणं गरजेचं आहे. एका नोकरीवर तुमचं घर नीट चालत नसेल तर तुम्ही एकापेक्षा अधिक नोकऱ्या देखील करू शकतात. यालाच मूनलायटिंग असं बोललं जातं. मूनलायटिंग ही काळाची गरज झाली आहे. मूनलायटिंग ही संकल्पना या आधीच प्रचलित आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अनेकजण मूनलायटिंगचा वापर अतिरिक्त कमाईसाठी करतात. (Would you like to moonlight Know everything)
कोरोनाचा आर्थिक फटका सगळ्यांनाच बसला आहे. अशात अनेकांची भविष्यातील गणितं कोलमडली आहेत. आर्थिकदृष्ट्या सगळंच पुर्वपदावर यायला वेळ लागेल. त्यामुळे नोकरदार वर्गातील बऱ्याचजणांनी एकाच वेळेस दोन कंपनीत नोकरी करण्याची तयारी आणि जवाबदारी दाखवली. अर्थातच यामध्ये प्रायव्हसी मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
मूनलायटिंग विचार का करावा?
1. प्लॅन बी : (Plan B)
बऱ्याचदा कर्मचारी बॅक अप प्लॅन म्हणून देखील दुसऱ्या कंपनीत काम करतात. अशावेळेस कंपनीकडून येणारा पगार उशिरा आल्यास त्या व्यक्तीकडे बॅकअप असल्यामुळे आर्थिक गणिते कोसळत नाहीत. अनेकदा आपण नोकरीच्या जोरावर लोन घेतो, मग अशावेळेस बॅकअप प्लॅन असेल तर लोनचे हफ्ते भरण्यास अडचण आणि दडपण येत नाही.
2. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम : (Multiple Source of Income)
आपल्याकडे कायम कमाईचे एकपेक्षा अधिक स्रोत असावेत असं आर्थिक सल्लागार कायम सांगतात. याने आपल्यावरील पैशांचं बारदान कमी होण्यास मदत होते.
आणखी वाचा... बापरे! मुलगी 4 फुट उंच उडाली, चालत्या बाईकवरून जीवघेणा स्टंट, पाहा VIDEO
3. कर्ज फेडण्यास होते मदत : Paying Off Debt :
लॉकडाऊनमध्ये बऱ्याचजणांचे जॉब गेले. ज्यांची नोकरी राहिली त्यातील अनेकांचे वेळेत पगार झाले नाहीत किंवा पगारामध्ये कपात करण्यात आली. अशावेळी तुम्ही जर मूनलायटिंग करत असता तर तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळून वेळेवर कर्जफेड करण्यास मदत झाली असती.
4. करिअरमधले बदल (Career changes)
स्वत:ची गुणवत्ता आणि मार्केट Value ओळखण्यासाठी देखील अनेकजण एकापेक्षा अधिकठिकाणी काम करून पाहतात. यामुळे करिअरमधला बदल ओळखण्यास मदत होते. हा अधिकच जॉब Freelancing चा देखील असू शकतो. अनेकदा अशा विकल्पांमधून तुम्हाला वेगळा अनुभव मिळतो आणि अनुभव कधीही वाया जात नाही.
5. पॅशन (Passion)
कामाची वेळ संपल्यावर संध्याकाळी संगीतकार म्हणून काम करणे हे देखील मूनलायटिंगमध्ये येते. पण इथे पॅशन म्हणून तुम्ही काम करु शक, यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल मात्र पैसे किती मिळतील याबाबत शंका आहे.
मूनलायटिंग विचार कोणी करावा?
1. ज्यांना 9-5 जॉब व्यतिरिक्त अजून एखादा जॉब करायला आवडेल
2. कमाईत वाढ करायची असल्यास त्यांच्यासाठी मूनलायटिंग हा चांगलं पर्याय ठरू शकतो
मूनलायटिंग केल्यास लीगल कारवाई होईल का?
विप्रोचे चेअरमन रिषद प्रेमजी यांच्या म्हणण्यानुसार ही फसवणूक आहे. पण इन्फोसिसचे माजी डायरेक्टर मोहनदास पै यांच्यानुसार एम्पलॉयमेंट हा कर्मचारी आणि कंपनी यातील करार आहे. ज्यानुसार दिलेल्या वेळेत काम करणे अपेक्षित आहे. यानंतरच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी काय करावं हा व्यक्तिगत प्रश्न असल्याचं ते मानतात.
आणखी वाचा... उत्साह कमी करणाऱ्या या 5 सवयी तुमच्यात आहेत का? जाणून घ्या...
एका कंपनीत काम करत असताना दुसऱ्या कंपनीचं काम हाती घेणं कायदेशीर आहे का?
याबाबत माहिती घेण्यासाठी तुम्हाला कंपनीने दिलेलं ऑफर लेटर किंवा जॉयनिंग लेटर नीट तपासून घ्या. यामध्ये तुम्हाला कंपनीच्या गोपनीयतेबाबत आणि संबंधित अटींबाबत माहिती मिळेल. Violation Of Confidentiality हा मुद्दा नीट पहावा. जर तुमच्या कंपनीने याला मान्यता दिली असेल तर तुम्ही मूनलायटिंग करू शकतात. नाहीतर कंपनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जॉब सुरु करण्याआधी त्याही कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट नीट वाचावा लागेल आणि मगच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.