BIKE STUNT VIDEO : भारत जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे रस्ते अपघाताची सर्वाधिक संख्या आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातात (Road accident) 1.55 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील वाहन चालवताना अनेकजण काळजी घेताना दिसत नाही. अशातच एक धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.
सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक दुचाकी मोकळ्या रस्त्यावर धावताना दिसत आहे.
दुचाकी चालवणारा युवक बेधुंद होऊन फुल्ल स्पिडने गाडी चालवताना दिसतोय. (Road Stunt) त्याचबरोबर तो हळुहळू गाडीचा स्पीड देखील वाढवतो. रात्रीची वेळ असल्याने रस्ता मोकळा होता. त्यामुळे दुचाकी चालकाने कोणतीही पर्वा न करता गाडी सुसाट पळवली.
दुचाकीस्वाराच्या मागे एक मुलगी देखील बसलेली दिसत आहे. गाडी सुसाट जात असताना अचानक स्पीड ब्रेकर लागतो. मात्र, तरी देखील दुचाकीस्वार तरूण गाडीचा स्पीड कमी करत नाही. जशी गाडी स्पीड ब्रेकर क्रॉस करते, तशी मागे बसलेली तरूणी 4 फूट उंच उडते. नशीब चांगलं होतं म्हणून मुलगी पुन्हा बाईकवरच येऊन आदळली. दुचाकीस्वाराची एक चूक खुप महागात पडली असती.
पाहा व्हिडीओ-
Air time pic.twitter.com/kFTIHz5NLT
— UOldGu (@UOldguy) September 11, 2022
जीव धोक्यात घालू नका
व्हायरल झालेल्या व्हिडीओ तब्बल 22.6 मिलीयन लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 15 सेकंदाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय. तर गाडी चालवताना जीव धोक्यात घालू नका, असा सल्ला अनेकजण देताना दिसत आहेत.