Wrestlers Protest: `वाटलं तर गोळ्याही घालू`; त्या धुमश्चक्रीनंतर माजी IPS अधिकाऱ्याचे वादग्रस्त ट्वीट
Wrestlers Protest in Delhi: रविवारी झालेल्या गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंचे तंबू हटवले आणि विनेश फोगटसह बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.
Delhi Wrestlers Protest: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi News)) नवीन संसदेसमोर 'महापंचायत' आयोजित करण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) या गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यामुळे ताब्यात घेतले होते. यानंतर, सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल झाला, ज्यामध्ये विनेश आणि संगीता फोगट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असताना हसताना दाखवण्यात आले होते. त्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने आयटी सेलचे (IT cell) लोक मॉर्फ केलेला फोटो पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे, माजी आयपीएस अधिकारी एनसी अस्थाना यांचे एक वादग्रस्त ट्विट समोर आले आहे. ट्विटमध्ये त्यांनी कुस्तीपटूंना गोळ्या घालण्याबद्दल भाष्य केले आहे. त्यानंतर शवविच्छेदनाच्या टेबलवर पैलवानांना भेटू असेही म्हटले आहे. 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियाने यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला असे म्हटले होते. त्यावर माजी आयपीएस अधिकाऱ्याने ही धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती.
"गरज पडल्यास गोळ्याही घालू. पण तुमच्या सांगण्यावरुन नाही. सध्या तो फक्त कचऱ्याच्या पोत्यासारखे ओढून फेकले आहे. कलम 129 पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार देते. योग्य परिस्थितीत, ती इच्छा देखील पूर्ण होईल. पण हे कळण्यासाठी शिक्षित असणे आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू!," असे ट्विट एनसी अस्थाना यांनी केले आहे.
"हा आयपीएस अधिकारी आमच्यावर गोळ्या झाडल्याबद्दल बोलत आहे. समोर ये आम्ही उभे आहोत. मला सांग गोळी खायला कुठे यायचे आहे. मी शपथ घेतो की मी पाठ दाखवणार नाही, तुमची गोळी माझ्या छातीवर घेईन. हेच बाकी आहे आता. आमच्याशी वागणे योग्य आहे," असे प्रत्युत्तर बजरंग पुनियाने दिलं आहे.
याआधी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर कलम 147 (दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 186 (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे), 188 (दिलेल्या आदेशाचे पालन न करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. कलम 353 आणि 353 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे की दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास 7 दिवसांचा वेळ घेतला आणि आमच्या विरोधात तसे करण्यास 7 तासही लागले नाहीत.