मुंबई :  शिओमी नोट 4 या फोनची इंटरनेटवर झटपट विक्री होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 करोडहून अधिकजणांनी शिओमी नोट 4 हा फोन विकत घेतला आहे. पण आंध्रप्रदेशात नुकत्याच एका ग्राहकाच्या खिश्यामध्ये या फोनचा स्फोट झाल्याचे वृत्त साक्षी. कॉमने दिले आहे.  


भावना सूर्यकिरण हा तरूण बाईकवरून जात असताना त्याच्या मोबाईलचा स्फ़ोट झाला. हा स्फोट इतका गंभीर होता की, स्फोटानंतर बादलीभर पाणी घालून आग विझवली. स्फोटाच्या ज्वाळा आणि उष्णता तीव्र होत्या. त्यामुळे ताबडतोब हा फोन बाहेर काढणंही शक्य नवहते. त्यामुळे त्याच्या मांडीला गंभीर जखम झाली आहे.  


करोडोंमध्ये विक्री झालेल्या शिओमी नोट 4  या फोनचा स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही हा प्रकार घडला आहे.  पण नेमका स्फोट कशामुळे झाला याबाबत शहानिशा केली जाईल. अशी माहिती शिओमी च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी टेकहूक या वेबसाईटला दिली आहे.