Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending
Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
Delhi Metro Top 10 Viral Videos in 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रेंडिंग व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर. यावर्षी दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो ट्रेंडिंगमध्ये होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. कपलचा रोमान्स, अश्लील चाळे, वाद विवाद, तरुणींचे डान्सपासून भजन कीर्तनपर्यंत अनेक व्हिडीओ गाजले. एवढंच नाही तर दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओने अनेक वाद झाले. अखेर दिल्ली मेट्रो प्रशासन आणि दिल्ली महिला आयोगाला या व्हिडीओमुळे अनेक ठोस पाऊलं उचलावे लागले. या वर्षी 2023 मधील दिल्ली मेट्रोमधील टॉप 10 व्हिडीओ कुठले होते यावर एक नजर टाकूयात. (Year Ender 2023 Bikini Girl couple kiss romance and fight Top 10 Viral Videos Delhi Metro were trending in 2023)
दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून वाद
दिल्ली मेट्रोमधील टॉप 10 व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर जागेवरुन झालेल्या भांडताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप गाजला होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या यूजर्सने पोस्ट केला होता. या व्हिडीओ 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
दिल्ली मेट्रोमधील कपलचा रोमान्स
दिल्ली मेट्रो हा शब्द सोशल मीडियावर या वर्षी ट्रेंडिंगमध्ये होता. कारण दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे आणि रोमान्समुळे प्रवाशांना त्रासदायक ठरत होता. दिल्ली मेट्रोमधील अनेक कपलचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
'या' व्हिडीओने नेटकऱ्यांना केलं भावूक
दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जातोय. पालकांसोबत तीन मुलांचा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करतोय. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (@salty_shicha_official) नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दिल्ली मेट्रोमधील महिलांमध्ये वाद
दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून दोन महिलांमध्ये वाद झाला. यादरम्यान दोन्ही महिला आपापसात इंग्रजीत वाद घालताना दिसल्या. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
कपलची मारामारी
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये महिला आणि पुरुषामध्ये झालेल्या वादाच्या वेळी महिलेने त्या पुरुषाला जोरदार कानशिलात लगावली. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
पंतप्रधान मोदींचा मेट्रो प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी17 सप्टेंबरला धौला कुआनमधून मेट्रोमधून प्रवास करत द्वारका गाठलं. यशोभूमी द्वारका सेक्टर 25 मेट्रो स्टेशनचं उद्घाटनचा हा दिवस होता. ज्यावेळी मोदींसोबत फोटो काढण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
धावत्या ट्रेनमध्ये लघवी
या व्हिडीओमध्ये एक तरुण धावत्या मेट्रोमध्ये लघवी करताना दिसला.
असे असंख्य व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही व्हिडीओ हे वादाचा भोवऱ्यात अडकले. कपलचे अश्लिल चाळे आणि दिल्ली मेट्रो हे समिकरण झालं होतं. या व्हिडीओंमुळे दिल्ली मेट्रो बदनाम झाली होती.