मुंबई : पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेनंतर आता आरबीआयने येस बँकेवरही निर्बंध घातले आहेत. येस बँकेच्या ग्राहकांना पुढच्या महिनाभरात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. आज संध्याकाळी ६ वाजता हे आदेश देण्यात आले आहेत. ३ एप्रिल २०२० पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. केंद्रीय अर्थखात्याने याबाबतचं नोटीफिकेशन काढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय कारण किंवा ग्राहकाच्या जवळच्या व्यक्तीचं लग्न असेल, तरच येस बँकेच्या ग्राहकांना ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीमध्ये आली आहे. 






स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेची दिवाळखोरी रोखण्यासाठी मदत करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच बँकेला दणका देण्यात आला आहे. 


आरबीआय आणि केंद्र सरकारने येस बँकेचं संचालक मंडळही ३० दिवसांसाठी बरखास्त केलं आहे. या ३० दिवसांमध्ये एसबीआयचे माजी डीएमडी आणि सीएफओ प्रशांत कुमार येस बँकेचा कारभार पाहतील.