आम्ही 24 तासांत अयोध्या विवाद सोडवू शकतो- योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासांच्या आत अयोध्या वाद मिटवण्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासांच्या आत अयोध्या वाद मिटवण्याचा दावा केला आहे. राम मंदिर प्रकरणी लोकांचे धैर्य आता संपत आले आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निर्णय देण्यास असमर्थ आहे. हे प्रकरण आमच्याकडे द्या मग 24 तासांच्या आत याचा निर्णय लागेल, असे योगी म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूकीत यूपीमध्ये भाजपाला 2014 च्या निवडणूकीपेक्षा जास्त जागा मिळतील अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा लवकर निर्णय लागावा यासाठी न्यायालयात अपील करणार आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 चा जागा वाटपावरील आदेश अद्याप दिला नाही आहे. बाबरी मंदिराचा ढाचा हा हिंदू मंदिर किंवा स्मारक नष्ट करण्यासाठीच उभा केला होता हेदेखील स्वीकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागाने याठिकाणी खोदकाम केले. हिंदू मंदिर किंवा स्मारक तोडूनच बाबरी मस्जिदचा ढाचा निर्माण केल्याचे मान्य केले.
केंद्र सरकारने याप्रकरणी अध्यादेश का काढला नाही ? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी हे प्रकरण विचारधीन आहे. सभागृहात विचारधीन असलेल्या प्रकरणांवर वाद होऊ शकत नाही. आम्ही हे न्यायालयावर सोडले आहे. 'न्यायालयाने 1994 मध्ये केंद्र सरकारने दाखल केलेल्या शपथपत्राच्या आधारे न्याय केला असता तर देशात चांगला संदेश गेला असता'. प्रश्न निवडणूकीत फायदा होण्याचा नाही तर देशभरातील जनतेच्या आस्थेचा आहे, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेसंच या समस्येच्या मुळात आहे आणि त्यांना याप्रकरणी कोणता निर्णय नकोय. जर अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला आणि तीन तलाकवर प्रतिबंध लागू झाला तर देशातून राजकारण कायमचे संपेल असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीमध्ये झालेल्या युती बद्दल त्यांना यावेळी विचारण्यात आले. जर ते जातींच्या आधारावर लढाई खालच्या पातळीवर नेत असतील तर 70-30 अशी लढाई होईल. 70 टक्के मतदार भाजपाच्या बाजुने आहेत तर 30 टक्के मतदान गठबंधनकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.