Latest News : लाउडस्पीकरवरून देशात बरंच राजकारण झालं. याला वादाची किनारही देण्यात आली. आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. जिथं, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एकदोन नव्हे, हजारोंच्या संख्येनं लाउडस्पीकर उतरवण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडोजर मॉडलमुळं देशभरात चर्चेत असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता लाउडस्पीकर हटवा मोहिम हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या या आदेशांनंतर आता उत्तर प्रदेशातील प्रशासकीय यंत्रणासुद्धा लाउडस्पीकर हटवण्याची मोहिम हाती घेताना दिसत आहेत. 


मंदिर, मशीद, आरती, अजान.... कोणत्या धार्मिक स्थळी लावण्यात आलेल्या लाउडस्पीकरमुळं नियमांचं उल्लंघन होत असेल तर ते उतरवण्यात यावेत असे आदेश त्यांनी दिले. ज्यानंतर मंदिर असो वा मशीद, लाउडस्पीकर उतरवण्याचं काम वेगानं हाती घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. कानपूरमधील एका नव्या मशीदीसोबतच बाराबंकीमध्ये असणाऱ्या मीनारावरील लाउडस्पीकरही आता उतरवण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : महायुतीत धुसफूस! लोकसभा निवडणुकांपूर्वी शिंदे गटाच्या 'त्या' कृतीचं अजित पवार कसं उत्तर देणार? 


अचानक का सुरु झाली ही कारवाई? 


रविवारीच योगी आदित्यनाथ यांची एक बैठक झाली. ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेविषयी बरीच चर्चा झाली. याच बैठकीमध्ये धार्मिक स्थळांवर नियमांचं उल्लंघन करून लावण्यात आलेल्या लाउडस्पीकरचा मुद्दाही प्रकाशात आला. ज्यानंतरच तातडीनं ही कारवाई पोलिसांनी हाती घेतली. उत्तर प्रदेशात शांतता राखायची असेल तर, धार्मिक स्थळांवर आणि इतरत्रही लाउडस्पीकरचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. अन्यथा ते पूर्णपणे बंद करण्यात येतील अशा सूचना त्यांनी केल्या. 


मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर 61399 लाउडस्पीकर तपासण्यात आले. यामध्ये 7288 स्पीकरचा आवाज कमी करण्यात आला तर, धार्मिक स्थळांवर असणारे 3288 लाउडस्पीकर उतरवण्यात आले.