योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री; मंत्रिमंडळात कोणाला मिळाले स्थान, पाहा ही यादी
Yogi Adityanath Oath : योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेत. दोन हजारो समर्थकांच्या साक्षीने दोन उपमुख्यमंत्री आणि 52 मंत्र्यांसह योगींचा शपथविधी पार पडला.
लखनऊ : Yogi Adityanath Oath : योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेत. दोन हजारो समर्थकांच्या साक्षीने दोन उपमुख्यमंत्री आणि 52 मंत्र्यांसह योगींचा शपथविधी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थिती नजरेत भरणारी होती. (Yogi Adityanath Oath As Chief Minister)
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या केशवप्रसाद मौर्य यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली. मौर्य यांच्यासह ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी राणी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला.
योगी सरकारमधील स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री
नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रवींद्र जयस्वाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालू यांनी राज्यमंत्रिपदाची (स्वतंत्र प्रभार) शपथ घेतली.
योगी सरकारमधील राज्यमंत्री
योगीच्या सरकारमध्ये मयंकेश्वर सिंह, दिनेश खटिक, संजीव गौड, बलदेव सिंह ओलख, अजित पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम यांना राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले आहे.