लखनऊ : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्यात आलं आहे. मोघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे नाव दिले गेले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटमध्ये दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहे. जय हिंद जय भारत.'



यापूर्वी योगी सरकारने राज्यातील ११ शहीद व्यक्तींचं नाव रस्त्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. जय हिंद वीर पथ योजना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केली. शहीदांच्या सन्मानार्थ या मार्गांवर मोठे आणि आकर्षक फलक लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिले होते.