नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवनवे उच्चांक गाठत आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच चिंतेचे वातावण निर्माण झाले आहे. पण आता असे एक वृत्त समोर आलं आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना आता पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी कर्ज मिळणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी (STFC)तर्फे कर्ज देण्याची सुविधा देण्यात येत आहे. डिजिटलच्या आधारावर हे करण्यात येणार आहे. या प्रकरणी दोन्ही कंपन्यांनी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.


STFC तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, डिझेल, पेट्रोल आणि लुब्रिकेंट कर्जावर खरेदी करु शकता. एसटीएफसी सध्या वाहन आणि टायर खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे. ही सुविधा ग्राहकांसाठी खूपच मदत देणारी ठरणार आहे.


OTPने मिळणार सुविधा 


कंपनीने म्हटलं आहे की, या प्रकरणी होणारा व्यवहार रोकड आणि कार्डचा वापर करुन करता येईल. एसटीएफीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रेवांकर यांनी म्हटलं की, यामुळे छोट्या ट्रान्सपोर्ट मालकांना खूप फायदा होणार आहे. कर्जाची ही सुविधा वन टाईम पासवर्ड (OTP) वर आधारित डिजिटल मंचवरुन चालणार आहे. याची वैधता १५ ते ३० दिवसांपर्यंत असणार आहे.


इंडियन ऑईल करतेय डिझेलची होम डिलिव्हरी


यापूर्वी मार्च महिन्यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC)ने पुण्यात डिझेलची होम डिलिव्हरी सुरु केलीय. सुरुवातीला कंपनीने केवळ डिझेलची होम डिलिव्हरी सुरु केली होती. हे यशस्वी झाल्यानंतर पेट्रोलचीही होम डिलिव्हरी सुरु केली जाऊ शकते. यामुळे पेट्रोल पंपावर लावण्यात येणाऱ्या रांगेपासून नागरिकांना दिलासा मिळेल आणि घरा-घरात नागरिकांना मोफत पेट्रोल-डिझेलची डिलिव्हरी मिळेल.


असं मिळेल डिझेल 


कंपनीतर्फे होम डिलिव्हरीसाठी डिझेल भरणाऱ्या मशीनला एका ट्रकमध्ये लावण्यात येणार आहे. ही मशीन पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या मशीन सारखीच आहे. या ट्रकच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या घरी डिझेलची फ्रि होम डिलिव्हरी मिळते.