Dominos Fast pizza Delivery time in India: भारतात पिझ्झा चाहत्यांची संख्या मोठी आहे. पिझ्झाची दर मिनिटाला होणारी डिलिव्हरी पाहता असंच म्हणावं लागेल. भारतात डोमिनोज पिझ्झाला सर्वाधिक पसंती मिळते. आता पिझ्झा चाहत्यांनी कंपनीनं आनंदाची बातमी दिली आहे. आता 30 मिनिटात होणारी डिलिव्हरी 20 मिनिटात होणार आहे. गरमागरम पिझ्झा (Dominos Pizza) खाण्यासाठी आता 20 मिनिटं वाट पाहावी लागेल. डोमिनोज पिझ्झा विकणाऱ्या ज्युबिलंट फूडवर्क्स कंपनीने हा दावा केला आहे. कंपनी ही सर्व्हिस देशातल्या 20 राज्यांमध्ये करणार आहे. कंपनीने अजूनही या शहरांची नावं जाहीर केली नाहीत. ज्युबिलंट फूडवर्क्स ही भारतातील पहिली 30 मिनिटात पिझ्झा वितरण सेवा सुरू करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. 


या शहरांमध्ये सेवा सुरू होऊ शकते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशामध्ये 20 शहरे अशी आहेत जिथे जलद वितरण सेवा सुरू केली जाईल. या शहरांच्या यादीत मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नई या मेट्रो शहरांचा समावेश असेल. या शहरांमध्ये डॉमिनोजची फ्रँचाईजी आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, "नवीन डिलिव्हरी सेवा स्टोअरमधील प्रक्रिया सुधारणे, डायनॅमिक रिसोर्स प्लॅनिंग, तंत्रज्ञान अपग्रेडेशन, सुधारित ऑपरेशनल कार्यक्षमता आणि जवळपासच्या स्टोअर्सचा विस्तार करून चालविले जात आहे." डॉमिनोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रसेल वेनर यांच्या मते, 20 मिनिटांची डिलिव्हरी सेवा कंपनीचा भारतातील ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधोरेखित करेल.


बातमी वाचा- Optical Illusion Challange: पत्त्यातील तिसरा 8 हा अंक शोधून दाखवा, फक्त 7 सेकंदाचा अवधी


ज्युबिलंट फूडवर्क्स कंपनीने पुढे सांगितले की, या निर्णयामुळे ब्रँडला ओव्हरऑल टाइम ऑप्टिमाइज करण्यास मदत होईल. यासोबतच अन्नाचा दर्जा आणि डिलिव्हरी रायडरच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही.