मुंबई : ग्राहकांची बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. नोटबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे नाही जमा करु शकणार. म्हणजेच आता फक्त तुम्हीच तुमच्या एसबीआय खात्यात कॅश काऊंटरवर जाऊन पैसे जमा करु शकता. वडील देखील आपल्या मुलाच्या खात्य़ात पैसे नाही जमा करु शकणार.


का घेतला हा निर्णय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयला या नव्या निर्णयाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, नोटबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात बँक खात्यांमध्ये 500 आणि 1000 च्या नोटा जमा करण्यात आले. जेव्हा अशा लोकांची चौकशी केल्यानंतर असं समोर आलं की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. अनोळखी माणसाने त्यांच्या बँकेत हे पैसे जमा केले होते.


आयकर विभागाने सरकारी बँकांना सूचना दिल्यानंतर हा नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसरा कोणताही व्यक्ती तुमच्या खात्यात पैसे नाही जमा करु शकणार. बँकचे म्हणणं आहे की, ही व्यवस्था लागू केल्यानंतर दहशतवाद्यांना होणाऱ्या फंडीगवर ही परिणाम होणार आहे.


दुसऱ्याच्या खात्यात कसे जमा कराल पैसे


बँकेने हा नवा नियम आणल्यानंतर त्याला पर्याय देखील आणला आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे असतील तर त्याला खातेधारकाचे अनुमती पत्र आणावं लागेल. बँकेच्या काउंटरवर पैसे जमा करताना दिल्या जाणाऱ्या स्लीपवर ज्याचे खाते आहे त्याची सही असणं आवश्यक आहे.


ऑनलाईन पद्धतीने कोणीही कोणाच्या खात्यात पैसे जमा करु शकतात. ऑनलाईन पैसे जमा करण्यासाठी हा नवा नियम लागू नसणार आहे. एसबीआयचं म्हणणं आहे की, जर ग्रीन कार्ड आणि इंस्टा डिपॉजिट कार्ड असेल तर कोणताही व्यक्ती कोणाच्याही खात्यात या कार्डच्या माध्यमातून डिपॅाजिट मशीनमध्ये पैसे जमा करु शकतो.