मुंबई: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. महाराष्ट्राची माती आणि लावणीचं नातं खूप जुनं आहे. पण ही लावणी फडात नाही तर चक्क उसाच्या मळ्यात रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चक्क धुमाकूळ घातल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता उसाच्या फडात गुपचूप लावणी रंगली आहे. ही लावणी कोण्या तरुणीनं किंवा महिलेनं नाही तर एक तरुणानं सादर केली आहे. त्याच्या अदा आणि हातवारे इतक्या सुंदर पद्धतीनं केले आहेत की अनेक युझर्स त्याने सादर केलेल्या लावणीच्या प्रेमात पडले. 



लावणी प्रेमी स्त्री पेक्षाही सुंदर लावणी साजरी केली 'या' भावाने असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका युझरने तर म्हटलं आहे बरं झालं भाऊ तू साडी नेसली नाही नाहीतर तुला वाड्यावर उचलून नेलं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.


काही दिवसांपूर्वी रिक्षा स्टॅण्डवर एका तरुणानं उत्तम लावणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता उसाच्या फडातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर