मित्र किंवा जवळच्या व्यक्तीसोबत खाणं शेअर केल्यानं वाढतं वजन, हे आम्ही नाही हा Research सांगतोय
लहानपणापासून आपल्याला हे शिकवले आणि सांगितले जाते की आपल्याकडील वस्तु नेहमी दुसऱ्यांसोबत शेअर करुन खावी.
मुंबई : लहानपणापासून आपल्याला हे शिकवले आणि सांगितले जाते की आपल्याकडील वस्तु नेहमी दुसऱ्यांसोबत शेअर करुन खावी. असं केल्यामुळे प्रेम वाढतं असं यामागील कारण सांगितलं जातं. आपण आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या जवळील व्यक्तीसोबत जेवण जेवतो किंवा एखादा पदार्थ खातो. जसे की चिप्स, स्नॅक्स इत्यादी. परंतु तुम्हाला माहित आहे का की असं केल्यानं तुमचं वजन वाढतं? हो एका संशोधनातुन समोर आले आहे की, एकत्र खाल्याने वजन वाढण्याची शक्यता जास्त आहे. 'कंझ्युमर सायकॉलॉजी' या जर्नलमध्ये हा संशोधन अभ्यास प्रकाशित झाला आहे.
कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी या संशोधन अभ्यासात दावा केला आहे की, मिल शेअर करून खाल्ल्याने वजन वाढू शकते. कॅनेडियन शास्त्रज्ञ नखेत टेलर आणि थिओडोर नोजवर्डी म्हणतात की, आपण अनेकदा रेस्टॉरंटमध्ये चिप्स-स्नॅक्ससारखे अनेक खाद्यपदार्थ कुटुंब किंवा मित्रांसह शेअर करतो. परंतु असे केल्याने, अधिक कॅलरीज वाढतात. या सवयीमुळे लोकांचे वजन वाढते. परंतु याकडे अनेक लोकं दुर्लक्ष करतात.
हे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी 719 लोकांवर तीन प्रकारचे खाण्याच्या वर्तनाचे प्रयोग केले. पहिल्या प्रयोगात, त्यांना आढळले की मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासोबत एकाच प्लेटमध्ये चिप्स खाल्लेल्या लोकांचे वजन 18 टक्के वाढले. त्याच वेळी, केवळ चिप्स खाल्लेल्या लोकांचे वजन 15 टक्के वाढले. म्हणजेच यामध्ये 3 टक्क्यांचा फरक आढळून आला.
असं का होतं?
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक वेळा आपण जेव्हा एकटे खातो तेव्हा आपल्या ताटात किती जेवण किंवा खाद्यपदार्थ आहे हे आपल्याला माहित असतं, ज्यामुळे आपण पोटापुरतंच खातो, तसेच यामध्ये किती कॅलरीस आपण खातो हे देखील साधारणपणे आपल्याला कळतं.
परंतु तेच जर आपण आपल्या मित्रा सोबत खाल्लं तर आपण किती खातोय हे आपल्याला माहित नसतं आणि आपण बऱ्याचदा बोलता बोलता जास्त खातो. ज्यामुळे आपल्या शरीरात जास्त कॅलरीज होतात आणि आपले वजन वाढते.
त्यामुळे हे लक्षात घ्या की खाणे-पिणे इतरांसोबत शेअर करून आपण अधिक कॅलरीज घेतो.
या अभ्यासात शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, अन्नाची देवाणघेवाण करताना आपण अन्नामध्ये किती तूप-तेल आहे याचा विचार करत नाही किंवा जास्त लक्ष देत नाही.
त्याबद्दलची आपली वृत्ती 'मुक्त' सारखी असते. समजा आपण एकत्र डबा खात असाल, तर आपल्या घरचं खाऊंन लोकांना कंटाळा येतो आशा वेळी लोकं जेवणाची अदलाबदली करतात. अशा वेळी समोरच्याच्या जेवणाची चव वेगळी असल्याने आपल्याला ते आवडीने खातो. जे आपल्याला जास्त होते आणि यामुळे देखील आपले वजन वाढते.
त्यामुळे पुढच्यावेळेपासून मित्रांसोबत खाण्याचे पदार्थ शेअर करताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि काळजी घ्या.