Ration Card Rules : तर `या` 4 स्थितीत तुमचं रॅशन कार्ड रद्द होऊ शकतं
राशनकार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
मुंबई : राशनकार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सरकारने कोरोनाच्या काळात गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचं सरकारच्या गेल्या काही दिवसांत नजरेत आलं. (your ration card will be canceled in these 4 situations know what are the latest rules)
कारवाईची शक्यता
त्यामुळे जनतेने पुढाकार घेऊन स्वतःची शिधापत्रिका रद्द करून घ्यावी, असं आवाहन सरकारतर्फे जनतेला करण्यात आलंय. शिधापत्रिका रद्द न केल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. तसेच योजनेचा गैरफायदा घेतलेल्या राशनकार्ड धारकांवर कारवाई होऊ शकते.
नियम काय आहेत?
जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात 2 लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वार्षिक 3 लाखांचे कौटुंबिक उत्पन्न असेल, तर अशा लोकांनी स्वतःचे रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.
....तर वसूली होणार
शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिका धारकाने कार्ड सरेंडर न केल्यास, पथक छाननी करेल. त्यानंतर छाननीत अशा लोकांचं रद्द केलं जाईल. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केलं जाईल.