कोयम्बतूर : सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पून्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतात. तसेच सेल्फीचं काढण्याचं याडंही अनेकांना लागलं आहे. मात्र, सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी आपला प्राण गमावल्याचं पहायला मिळत आहे.


तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात सेल्फी काढणाऱ्या एका २२ वर्षांच्या युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. धबधब्याजवळील पॉईंटवर सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला.


उंचीवरुन खाली कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचं नाव रंजीत कुमार असे आहे. तो कोटगिरीमधील कॅथरीन फॉल्सवर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.


मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत कुमार हा अपघातस्थळापासून ४५ किमी दूर असलेल्या मेट्टूपालयम येथे राहणारा होता.