रामदास आठवले यांच्या अंगावर काळा झेंडा टाकला
हा सर्व प्रकार पत्रकार परिषद सुरू असताना घडला. या घटननेनंतर या तरुणाला.
सूरत : 'दलितांवर अत्याचार होत असताना आमचे नेते राजकारणात व्यस्त आहेत', असा आरोप करीत एका दलित तरुणानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, यांच्या अंगावर काळा झेंडा टाकला. सूरतमध्ये हा प्रकार घडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नेते रामदास आठवले हे एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत.
आठवले काहीच बोलत नाहीत, असा आरोप
देशात अनेक ठिकाणी दलित समाजावर अत्याचार सुरू आहे. त्याविरोधात आठवले काहीच बोलत नाहीत, असा आरोप करीत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या एका दलित तरुणानं आठवलेंच्या खांद्यावर काळा झेंडा टाकून निषेध नोंदवला.
तरुणानं अचानक काळा झेंडा टाकला
रामदास आठवलेंच्या मागे उभ्या असलेल्या तरुणानं अचानक काळा झेंडा टाकल्याने कोणालाच काहीच समजलं नाही. हा सर्व प्रकार पत्रकार परिषद सुरू असताना घडला. या घटननेनंतर या तरुणाला बाहेर काढण्यात आले.