अफवांवर विश्वास ठेवू नका! ZEE MEDIA- अदानी ग्रुपमध्ये कोणताही करार नाही
ZEE MEDIA- अदानी ग्रुपमध्ये कोणताही करार नाही, व्हायरल होणाऱ्या त्या ट्वीटमागचं पाहा सत्य
मुंबई : सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे यावर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन झी मीडियाच्या वतीनं करण्यात येत आहे. सोशल मीडियावर फिरणारी पोस्ट ही निव्वळ अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. ही बातमी वेगाने पसवण्याचं काम जाणीवपूर्वक करण्यात येत आहे.
अदानी ग्रुप आणि झी मीडिया यांच्या करार झाला असून, काही हिस्सेदारी विकत घेतल्या दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ही अफवा असून असा कोणताही करार दोन्ही ग्रुपमध्ये झाला नाही.
असा कोणताही करार झाला नसल्याचे झी मीडियाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. झी मीडिया कंपनी व्यवस्थापनाने सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांचे पूर्णपणे खंडन केलं. कंपनी आपल्या वतीने याबाबत अधिकृत निवेदनही जारी करणार आहे.
गौतम अदानी आणि सुभाष चंद्रा यांच्यात एक विशेष करार झाला, असं ट्वीट एका युझरने सोशल मीडियावर केलं. त्यानंतर याची सोशल मीडियावर वेगानं चर्चा सुरू झाली. अदानी एंटरप्रायझेस झी मीडिया विकत घेत आहे. संपूर्ण डील रोख स्वरूपात 30 रुपये प्रति शेअर असेल.
संजय पुगलिया झी न्यूजचे सीईओ असतील अशा प्रकारचा आशय या ट्वीटमध्ये देण्यात आला होता. मात्र अशा कोणत्याही प्रकारे दोन्ही ग्रुपमध्ये करार झाला नाही. या बातम्या आणि फिरणारी पोस्ट अफवा असल्याचं झी मीडियाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
काही लोकांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर अफवा पसरवल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारे व्हायरल पोस्ट किंवा फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन झी मीडिया व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. दोन्ही गटांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.