Harsh Sanghavi: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय.भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय. या मंचावरुन राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध विषयावंर चर्चा होत आहेत. गुजरात सरकारचे सर्वात तरुण मंत्री हर्ष संघवी यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी आव्हाने स्वीकारणारा व्यक्ती आहे. पळून जाणारा नाही. त्यामुळे गृहराज्यमंत्री म्हणून मी रोज नवीन काही ना काही शिकत असतो. यावेळी नवी आव्हाने येत असतात, असे यावेळी संघवी म्हणाले. मी मोठ्यांचा आदर करणारा व्यक्ती आहे. माझ्या राज्यातील नागरिकांचे मुद्दे मी मांडत असतो. वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले. 


56 वर्षे पालिकेकडे असणारं कार्यालय एका अर्जाने वफ्फ बोर्डाकडे जातं. एका व्यावसायिकाचे थिएटर रातोरात तुटते आणि वक्फ बोर्डाला मिळते. रिझर्व्ह जंगल फॉरेस्टची जागा रातोरात वक्फ बोर्डाला मिळते. वक्फ बोर्डाची जागा त्यांनी खासगी बिल्डरला विकली. जी प्रॉपर्टी सामान्यांनी विकत घेतली, त्यात त्यांना अधिकार मिळत नाही. त्यामुळे कायद्यात झालेल्या नव्या बदलामुळे मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, असे म्हणतो. 


ओवेसींवर टी


वक्फ संदर्भात झालेल्या बदलामुळे अल्पसंख्यांकांचे हित धोक्यात आल्याची टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली. कोणाचं सेक्युरिझम संपणार नाही, मुस्लिमांचे हित संपणार नाही. यामुळे मुस्लिमांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना त्रास होणार आहे, असा टोला त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांना लगावला. हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा विषय बनला आहे. वक्फचे अमेंडमेंट मी तपशीलवार वाचलंय. स्वत:चे दुकान बंद होऊ नये म्हणून ओवेसी विविध विधाने करतायत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.


गुजरातमध्ये बुलडोजर राज?


सार्वजनिक जागेवर कोणतही अनधिकृत बांधकाम झालं की ते तोडलं जाणार, आम्ही त्यासाठीच येथे बसलोय, असे संघवी म्हणाले. गुजरात सर्वाधिक रोजगार देणारे राज्य आहे. बुलडोजर हे आमच्या मॉड्यूलचा एक भाग आहे. पूर्ण मॉड्यूल नाही. आम्ही गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा देतो. कोणाच्या अधिकृत जागेवर आम्ही बुलडोजर चालवत नाही. 


सोमनाथ मंदिराजवळ बुलडोजर चालल्याचा प्रकार समोर आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सोमनाथ मंदिर हे आमच्या आस्थेचा विषय आहे. येथे काही अनधिकृत असेल तर आम्ही त्यावर कारवाई करु असे ते म्हणाले. 


गुजराती सकाळी 5 वाजेपर्यंत गरबा खेळतील


गुजरामध्ये रात्री 12 वाजता गरबा खेळणे बंद होते. पण गुजराती सकाळी 5 वाजेपर्यंत गरबा खेळतील, गुजरातमध्ये गुजराती गरबा नाही खेळणार मग कुठे खेळणार? त्यांना जितका गरबा खेळायचाय तितका खेळायला मिळेल, असे ते म्हणाले.