Zerodha: शेअर बाजारच्या गुंतवणूकदारांना Nithin Kamath ने दिलाय मोलाचा सल्ला
देशातील नामांकित ब्रोकरेज हाउस असलेल्या Zerodha चे को-फाऊंडर नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
मुंबई : शेअर बाजारात पैसे गुंतवून भरगच्च परतावा मिळवता येतो. यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास (Share Market Study) करावा लागतो. देशातील नामांकित ब्रोकरेज हाउस असलेल्या Zerodha चे को-फाऊंडर नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
भारताच्या आणि अमेरिकेच्या शेअर बाजारात मागच्या काही महिन्यांपासून मोठा फरक दिसून येत आहे. असं बोललं जातं की, अमेरिकेच्या शेअर बाजार थोडाजरी डगमगला तर इतर देशांचा शेअर बाजार कोलमडतो. जागतिक स्तरावरच्या बाजारपेठेत (Global Market) अमेरिकाच्या शेअर बाजाराचं वर्चस्व राहिलेलं आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदार अमेरिकेच्या शेअर बाजाराकडे लक्ष देऊन असतात.
अनेक गुंतवणूकदारांना एक वाईट सवय असते ती म्हणजे रात्रीच्या वेळी अमेरिकेच्या शेअर बाजाराकडे (US Stock Market) लक्ष ठेऊन असतात. अमेरिकेच्या शेअर बाजाराकडे लक्ष देण्यापेक्षा रात्री सुखाची झोप घ्यायला हवी. असा सल्ला झेरोधाचे को-फाऊंडर नितीन कामथ यांनी शुक्रवारी (30 सप्टेंबर, 2022) ट्वीटद्वारे सल्ला दिला आहे.
जागतिक बाजारात मागच्या काही महिन्यांपासून अनेक समस्या पाहायला मिळत आहेत. यूक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा परिणाम जागतिक आर्थिक मंदी येण्यास मदत झाली आहे. असं असतानाही, भारतीय शेअर बाजारात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात 20 टक्क्यांची घसरण झाली आहे.
अमेरिकेच्या आर्थिक संकटामुळे अमेरिकेच्या केंद्रीय बँकेकडून सातत्याने इंट्रेस्ट रेटची वाढ केली जातीये. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने 21 सप्टेंबरला 0.75 टक्क्यांनी इंट्रेस्ट रेट वाढवला आहे. आर्थिक समस्या अशाच राहिल्या तर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेच्या एकूणच आर्थिक विकासावर परिणाम झाला आहे.