मुंबई : झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉय आणि बंगलुरू महिला ग्राहकादरम्यान मारहाण झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील महिला हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या अगोदर महिलेला मारहाण करण्याच्या विरोधात झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. (Zomato Delivery Boy Case field against Model Hitesha Chandrani) तसेच पोलिसांनी त्याला अटक देखील केलं होतं. हितेशाने इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करून घडलेला प्रकार सांगितला होता. 


हितेशा विरोधात या कलमांतर्गत गुन्हा दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज याने केलेल्या तक्रारीमुळे बंगलुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्टेशनमध्ये हितेशा चंद्राणी विरोधात एफआयाआर दाखल करण्यात आली आहे. हितेशा विरोधात आयपीसी कलम 355(हल्ला), 504(अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Zomato बॉयने दिली धक्कादायक माहिती 


जेव्हा मी पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. यासाठी मी त्यांची माफी देखील मागितली. खराब रस्ता आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असे सांगितले. त्यामुळे झोमॅटोवरून मागविलेले जेवण उशिराने आल्याने  मॉडेलने रद्द केले. एवढंच नव्हे तर मॉडेल असलेल्या हितेशा चंद्राणीला कामराजने बुक्का मारला नाही, उलट कामराज येताच हितेशानेच त्याच्यावर हल्ला केला.(Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत) 


त्या दिवशी नेमकं काय घडलं? 


पुढे कामराजने सांगितलं की, 'हितेशाने जेवण ताब्यात घेतले परंतू तिने पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे. हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झॉमॅटो सपोर्टने कामराजला ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. जेव्हा तिने ते मागे देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता. 


तरी देखील ती त्याला शिव्या देतच होती. अचानक तिने डिलिव्हरी बॉयवर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिने चुकून तिचाच हात नाकावर मारला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही त्याने पोलिसांना सांगितले.  तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झाली आहे, मी मारल्यामुळे नाही.